Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी वाढ; कापूस, सोयाबीन, तूर, तसेच काय आहेत हरभरा दर?

Market Update : आपण सोयाबीन, कापूस, हळद, आले आणि लिंबू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या भावात चढ उतार दिसून आले. सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत १२.३८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयातेल ४५.२५ सेंटवर होते. सोयापेंडचे वायदे आजही ३७७ डाॅलरवर टिकून होते. देशातील बाजारात सोयाबीनची आवक आणि भावही स्थिर होते.

सोयाबीनचा भाव त्याच पातळीवर म्हणजेच ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होता. सोयाबीनचा भाव आणखी काही दिवस या पातळीवर दिसू शकतो, असा अंदाज आहे. 

Agriculture Market
Agrowon Podcast : गव्हाचे भाव तेजीत; कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा यांचे काय आहेत दर ?

कापसाच्या वायद्यांमध्येही चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा वायदा आज दुपारपर्यंत ८१.२२ सेंट प्रतिपाऊंडवर होते. कालच्या तुलनेत वायदे वाढलेले दिसले तरी वाढ काहीशी कमी झाली होती. देशातील बाजारात वायदे कालच्या पातळीवर म्हणजेच ५८ हजार २०० रुपये प्रतिखंडीवर होते.

तर बाजार समित्यांमधील भावपातळी ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलवर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील सुधारणा टिकल्यानंतर देशातही सुधारणा अपेक्षित आहे, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. 

हळदीच्या भावातील तेजी कायम आहे. सध्या लग्नसराईमुळे हळदीला चांगला भाव मिळत आहे. तर दुसरीकडे बाजारातील हळदीची आवक कमीच आहे. देशातील उत्पादन यंदा घटल्याने आवकेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ऐन आवकेच्या हंगामातही भाव चांगले होते. सध्या हळदीला सरासरी १४ हजार ते १८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील. पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते. त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Chana Market Rate : हरभऱ्यातील तेजी किती दिवस टिकेल ? हरभऱ्याचा भाव कोणत्या कारणांनी कमी होऊ शकतात?

आल्याचे भाव काही प्रमाणात नरमलेले दिसत आहेत. बाजारातील आल्याचा पुरवठा मर्यादीतच आहे. तर उठावही टिकून आहे. मात्र यंदा चांगल्या पावसाचा अंदाज आहे. तसेच आल्याचे भाव तेजीत असल्याने लागवड वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आल्याच्या भावात काहीशी नरमाई आल्याचे व्यापारी सांगत आहेत.

सध्या आल्याचे भाव सरासरी भावपातळी सध्या ७ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

लिंबाच्या भाव काही बाजारांमध्ये काही प्रमाणात नरमले आहेत. राज्यातील बहुतांशी भागात सध्या ढगाळ वातावरण आणि पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे लिंबाचा उठाव काहीसा कमी झाल्याचं व्यापारी सांगत आहेत. दुसरीकडे बाजारातील लिंबाची आवक कमी कमीच आहे.

तरीही बाजारात लिंबुला गुणवत्तेप्रमाणे ४ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे. लिंबाचे हे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com