Soybean Variety : यंदाच्या खरीप हंगामासाठी सोयाबीनचे दर्जेदार वाण

Team Agrowon

सोयाबीन बियाण्याची मागणी वाढती

महाराष्ट्रात सोयाबीनच्या पेरणी  क्षेत्रात वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे दरवर्षी सोयाबीन बियाण्याची मागणी वाढतीय.

Soybean Variety | Agrowon

सोयाबीनचे महत्वाचे वाण

सोयाबीनच्या फुले संगम, फुले किमया, फुले दूर्वा यासारख्या जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असतो. या वाणांशिवायही सोयाबीनचे अजून असे काही वाण आहेत ज्यापासून चांगल उत्पादन मिळू शकतं. 

Soybean Variety | Agrowon

सोयाबीनचे नवीन चार वाण

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे नवीन चार वाण प्रसारित केले आहेत. अवर्षण काळात किंवा जास्त पावसामध्येही या वाणांनी चांगले उत्पादन दिल्यामुळे हे वाण कमी दिवसातच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत. 

Soybean Variety | Agrowon

पीडीकेव्‍ही अंबा (एएमएस १००-३९)

पीडीकेव्‍ही अंबा म्हणजेच एएमएस १००-३९. हे वाण लवकर परिपक्व होणारे, जास्त उत्पादन क्षमता असलेले, तीन दाण्यांच्या शेंगा आणि दाण्यांचे वजन जास्त असलेलं वाण आहे. बियांमध्ये तेल आणि प्रथिनांच प्रमाणही इतर वाणांपेक्षा जास्त आहे.

Soybean Variety | Agrowon

पीडीकेव्‍ही पूर्वा (एएमएस २०१४-१)

पीडीकेव्‍ही पूर्वा म्हणजेच एएमएस २०१४-१. सध्या या वाणाची पूर्व विदर्भातील जास्त पर्जन्यमान असलेल्या भागात उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी बीजोत्पादन प्रात्यक्षिके घेतली जात आहेत.

Soybean Variety | Agrowon

पीडीकेव्ही येलोगोल्ड (एएमएस १००१)

पीडीकेव्ही येलोगोल्ड म्हणजेच एएमएस १००१. हे वाण निश्‍चित ते मध्यम पर्जन्यमानाच्या भागात उत्तम निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीत लागवड केल्यास प्रचलित वाणांपेक्षा हमखास जास्त उत्पादन देते.

Soybean Variety | Agrowon

सुवर्ण सोया (एएमएस-एमबी ५-१८)

सुवर्ण सोया म्हणजेच एएमएस-एमबी ५-१८. या वाणाच्या मूळकुज, खोडकुज या रोगाला प्रतिकारक्षमतेच्या गुणधर्मामुळे या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, प्रसार जास्त असलेल्या भागामध्ये लागवडीस उपयुक्त ठरते.

Soybean Variety | Agrowon

Water Crisis : पाणीटंचाईची झळ ; महिलांचे हाल