Sonkheri Cattle: शेतीकामासाठी कणखर ‘सोनखेरी गोवंश’

Desi Cattle Conservation: राज्यांच्या सीमा या डोंगररांगा, नद्या यांसारख्या नैसर्गिक किंवा भौगोलिक घटकांवरून ठरतात, ज्यामुळे अशा सीमावर्ती भागातील पशुधन लगतच्या भूप्रदेशातील पशुधनाच्या संकरातून निपजले जाते.
Desi Livestock
Desi LivestockAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्रवीण बनकर

Traditional Cattle: राज्यांच्या सीमा या डोंगररांगा, नद्या यांसारख्या नैसर्गिक किंवा भौगोलिक घटकांवरून ठरतात, ज्यामुळे अशा सीमावर्ती भागातील पशुधन लगतच्या भूप्रदेशातील पशुधनाच्या संकरातून निपजले जाते. दोन भिन्न पशुधनाचे बाह्यगुण किंवा रंगरूप एकत्रितरीत्या दिसत असल्याने त्याकडे मिश्र, गावठी किंवा अवर्णीत (नॉन डिस्क्रिप्ट) म्हणून बहुगुणी पशुधन दुर्लक्षित राहते. वास्तविक असे सीमावर्ती भागातील पशुधन हे जमिनीतील मूलद्रव्ये, हवामान, चारापाणी अशा अनेक वर्षांच्या नैसर्गिक परिणामातून घडलेले असते.

महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असे मिश्र पशुधन सहज पाहायला मिळते. उत्तर महाराष्ट्रातील गुजरात राज्यालगत असलेले आणि दिसायला काहीसे डांगी गोवंशासारखे पण शरीरयष्टीने लहान बांध्याचे असणारे ‘सोनखेरी’ हे महत्त्वाचे अवर्णीत गोधन आहे. १९५३ मध्ये प्रा. एल. बी. कुलकर्णी यांनी खानदेशातील सोनखेड गावावरून ओळखल्या जाणाऱ्या सोनखेरी गोवंशाबद्दल आपल्या पुस्तकात नोंद असल्याचे सोनखेरी गोवंशाचे स्थानिक अभ्यासक धीरजकुमार सोनवणे सांगतात.

Desi Livestock
Umarda Cattle Breed : उष्ण वातावरणात तग धरणारा ‘उमरडा गोवंश’

स्थानिक पातळीवर गुराखी साधारण २० ते ५० सोनखेरी गायींचा कळप चराईसाठी घेऊन जातो. पावसाळ्याच्या दिवसात केवळ तात्पुरता निवारा उभारण्याकडे गोपालकांचा कल दिसून येतो, एरवी हे पशुधन मुक्तसंचार पद्धतीने वावरते. नवजात वासरू चारा खाणे सुरू करेपर्यंत दूध पाजले जाते. धुळे, पिंपळनेर, चाळीसगाव, शहादा, दोंडाईचा, नवापूर, शिरपूर अशा स्थानिक बाजारपेठेत सोनखेरी गोवंशाची खरेदी विक्री होताना दिसते. टणक खुरांमुळे अधिक पर्जन्यछायेतील भागात शेतीकामासाठी उपयुक्त ठरते. एका कुटुंबासाठी गरजेपुरते दूध, शेणखत आणि शेतीकाम अशा तिहेरी कामांसाठी उपयुक्त असल्याने सोनखेरी गोवंश स्थानिक पशुपालकांत विशेष लोकप्रिय आहे.

गोवंशाची ओळख

साधारणतः तापी आणि गोदावरी नदीच्या खोऱ्या निपजलेल्या या सोनखेरी गोवंशाचा सांभाळ स्थानिक भिल्ल, कोकणी, मावची, पावरा अशा गोपालकांकडून होत आहे.

निमारी (मध्य प्रदेश), गीर (गुजरात), डांगी आणि देवणी (महाराष्ट्र) अशा लोकप्रिय गोवंशाच्या तुलनेत रोगप्रतिकारक्षमता, विषम वातावरणात तग धरण्याची क्षमता, उपलब्ध चराईक्षेत्रामध्ये गुजराण करीत दूध उत्पादन देण्याची क्षमता या गुणांमुळे सोनखेरी गोवंश स्थानिक पशुपालकांत आपली लोकप्रियता टिकवून आहे.

Desi Livestock
Indigeneous Cattle: उंबर्डा, खामगावी गोवंशाला ‘माफसू’ देणार ओळख

तपकिरी, काळा, पांढऱ्या किंवा यांच्या मिश्र रंगसंगतीमध्ये सोनखेरी गोवंश दिसतो. चकाकत्या तपकिरी रंगाने एक प्रकारची सोनेरी झळाळी असल्याचा भास होतो म्हणून डांगी आणि निमारी यांच्या संकरातून उत्क्रांत झालेली सोनखेरी गुजरातलगतच्या भागात धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये ‘सोनकी’ या नावाने परिचित आहे.

तपकिरी रंगाच्या गाईच्या मानेवर अनेकदा काळपट पट्टे दिसतात, त्यांना बोलीभाषेत ‘वाघ्या’ म्हटले जाते. तपकिरी रंगाच्या गायींना ‘सोनखेरी’ आणि गडद तपकिरी रंगाच्या गायींना ‘कालाखेरी’ म्हणतात.सपाट कपाळमाथा, वर जाणारी मजबूत आणि आखूड शिंगे तसेच टणक खुरे, कान मध्यम आकाराचे असून आतल्या बाजूने पिवळसर रंगाचे असतात.

उजळ गुलाबी रंगाची कास आणि तेलकट कातडी ही सोनखेरीची खास लक्षणे आहेत.

नाकपुड्यांचा रंग काळा व क्वचित फिकट तपकिरी असतो. मानेची पोळी आणि वशिंड मध्यम आकाराचे असते. काही गोवंशाच्या कपाळावर निंबोरी आढळते. गडद रंगाच्या जनावरांवर पाठीचा मणका मात्र उजळ रंगाचा दिसतो.

गाईची अर्धा ते एक लिटर दूध उत्पादनाची सरासरी आहे. काही गाई प्रति दिन २.५ ते ३ लिटर दूध उत्पादन देतात. मात्र अशा गोधनाची पशुपालकाकडून स्थानिक गोधनासोबत आंतरपैदास होत असल्याने शुद्ध सोनखेरीची संख्या पैदास क्षेत्रात कमी होत आहे. एका वेतात सरासरी ५०० ते ६०० किलोग्रॅम इतके दूध उत्पादन होते.

- डॉ. प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९

(पशुआनुवांशिकी व पैदास शास्त्र विभाग,स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com