
Parbhani News : जिल्ह्यात बुधवार (ता. ४) ते रविवार (ता. ५) या कालावधीत भरणाऱ्या जनावरांच्या आठवडी बाजारामध्ये गोवंश जनावरांची वाहतूक व खरेदी-विक्रीवर जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी निर्बंध लावले आहेत.
शनिवारी (ता. ७) बकरी ईद हा सण साजरा होणार आहे. या सणासाठी मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल, कुर्बानी करण्यात येते. महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९९५ सुधारणा ४ मार्च २०१५ पासून राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. या सुधारित अधिनियमाप्रमाणे गोवंशाची कत्तल करण्यास मनाई आहे.
या अधिनियमातील कलम ५ अ अन्वये गोवंशाची कत्तल, कत्तलीसाठी वाहतूक, कत्तलीसाठी निर्यात, कत्तलीसाठी खरेदी-विक्री, कत्तलीकरिता विल्हेवाट, गोवंशाचे मांस ताब्यात ठेवण्यास व राज्याबाहेर कत्तल केलेल्या गोवंशाचे मांस ताब्यात ठेवण्यास सक्त मनाई आहे.
त्याअनुषंगाने बकरी ईद सणाच्या दिवशी आपल्या जिल्ह्यात कोठेही गोवंशाची कत्तल होणार नाही. उपरोक्त अधिनियमांचे उल्लंघन होणार नाही यावर नियंत्रण ठेवावे व या बाबींशी संबंधित सर्व विभागांना तशा सूचना देण्याबाबत आदेशित केले आहे.
जिल्हास्तरीय शांतता समितीचे बैठकीत याबाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. परभणी जिल्ह्यात बुधवार (ता. ४) ते रविवार (ता. ८) या कालावधीतील आठवडे बाजारांमध्ये बकरी ईद अनुषंगाने कुर्बानीसाठी गोवंश: जातीच्या जनावरांची वाहतूक व खरेदी विक्री होण्याची शक्यता आहे.
आठवडी बाजारामध्ये गोवंश जनावरांची वाहतूक व खरेदी विक्रीवर निर्बंध लावणे बाबत आपले स्तरावर आदेश लागू करण्यासाठी पोलिस अधीक्षक यांनी विनंती केली आहे. त्यानुसार जनावरांच्या आठवडी बाजारामध्ये गोवंश जनावरांची वाहतूक व खरेदी-विक्रीवर जिल्हादंडाधिकारी गावडे यांनी निर्बंध लावले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.