Solar Cooker : स्वयंपाकासाठी सार्वजनिक सौर कुकर

Community Solar Cooker Concept : सात चौरस मीटर आकाराची डीश असलेल्या सौर चुलीचा वापर करून ४० ते ५० लोकांचा स्वयंपाक करता येऊ शकतो.
Community Solar Cooker
Community Solar CookerAgrowon
Published on
Updated on

डॉ. वैभवकुमार शिंदे, डॉ. अनिलकुमार कांबळे

सौर ऊर्जेचा वापर करून सार्वजनिक सौर कुकरच्या (कम्युनिटी सोलर कुकर) माध्यमातून स्वयंपाक करणे शक्य आहे. उन्हामध्ये असलेली सात चौरस मीटर आकाराची डीश घरामधील स्वयंपाक घरात सूर्य किरण परावर्तित करते. दुसरी परावर्तक डीश या सूर्य किरणांना भांड्याच्या तळाशी एकत्रित करते.

या भांड्यांना काळा रंग दिलेला असतो. या सौर ऊर्जेतून ४०० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान मिळत असल्याने कमी वेळेत अन्न शिजते. बॉक्स पद्धतीच्या कुकरमध्ये अन्न शिजायला वेळ लागतो. त्यामुळे हे कुकर पारंपरिक पद्धतीच्या चुलींसारखे काम करतात. फरक एवढाच असेल की पारंपरिक पद्धतीच्या चुली या वायू, वीज आणि जळण यांचा इंधन म्हणून वापर करतात, तर चूल इंधन म्हणून सौर ऊर्जेचा वापर करते.

वैशिष्ट्ये

सात चौरस मीटर आकाराची डीश असलेल्या चुलीचा वापर करून ४० ते ५० लोकांचा स्वयंपाक करता येऊ शकतो. इतर सौर चुलींमध्ये हे शक्य नाही. डीशचा प्रकार आणि उष्णतारोधकाचा प्रकार या गोष्टींवर उष्णतामान अवलंबून असते. जिथे वर्षभर चांगले उष्णतामान असते तेथे हा कुकर उपयुक्त आहे. या कुकरमध्ये एका वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अन्न शिजवता येते.

सूर्यकिरण हे घराच्या दिशेने परावर्तित केले जातात म्हणून घरामध्ये राहूनच स्वयंपाक करणे शक्य होते. भांडे ठेवण्यासाठी, अन्न टाकण्यासाठी आणि काढण्यासाठी बाहेर उन्हात जाण्याची आवश्यकता नाही.

Community Solar Cooker
Gokul Solar Energy Project : सोलापूर जिल्ह्यात ‘गोकुळ’ करणार सौरऊर्जा निर्मिती

भांड्याचा बुडाशी तीव्र सूर्यप्रकाश आणि अधिक तापमान एकवटल्याने स्वयंपाक करण्याचा वेग हा इतर प्रकारच्या कुकरच्या मानाने खूप अधिक आहे.

कुकरमध्ये अधिक तापमान मिळत असल्याने सर्व प्रकारचे पारंपरिक अन्न तयार करणे शक्य आहे जसे, चपाती, पुरी, डोसा इत्यादी. याबरोबरीने डाळ, फोडणी यांसारख्या गोष्टी शक्य आहेत. बॉक्स पद्धतीच्या कुकरमध्ये असे अन्न तयार केले जाऊ शकत नाही, ज्याला तळण्याची करण्याची गरज असते.

Community Solar Cooker
Solar Energy: सौरऊर्जा ग्राहकांना ‘टीओडी’ नाही

यंत्रणेमध्ये अशी तांत्रिक वेळ व्यवस्था केली आहे, की ज्यामुळे बाहेरील डीश स्वतःहून सूर्याबरोबर फिरते. स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला दिवसातून फक्त एकदा म्हणजे सकाळी ही डीश सूर्याप्रमाणे जुळवून घ्यावी लागते. नंतर मात्र ही डीश सूर्यप्रकाशाबरोबरीने फिरते. या यंत्रणेमध्ये डीश सोबत दोन आधार दिलेले असतात ज्यामुळे ही डीश ऋतूप्रमाणे सूर्याच्या हालचालींसोबत स्वतःला जुळवून घेऊ शकते.

ज्या वेळी कुकरमध्ये स्वयंपाक करणे चालू नसेल त्या वेळी पाणी गरम करण्यासाठी याचा वापर करता येऊ शकतो.

हा कुकर शाळा, महाविद्यालयीन स्वयंपाक घर तसेच व्यावसायिक, प्रशासनिक हॉटेल, धार्मिक आश्रम, दवाखाना, पोलिस दलाची स्वयंपाक घरे या सर्वांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. एक कुकर ५० लोकांच्या स्वयंपाकासाठी पुरतो. या कुकरच्या वापरामुळे एलपीजी सिलिंडर्सची बचत होते. एकावेळी शंभर लोकांचा स्वयंपाक होईल असे कुकर उपलब्ध आहेत.

- डॉ. वैभवकुमार शिंदे

९३०९८३७९३०

(कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com