
Pune News: घरगुती सौरऊर्जा ग्राहकांना टाइम ऑफ डे अर्थात ‘टीओडी’ पद्धत लागू होणार नसल्याची स्पष्ट तरतूद राज्य वीज नियामक आयोगाने केली आहे. परिणामी, सौरऊर्जेद्वारे साठवलेली वीज कोणत्याही वेळेत वापरण्याची मुभा घरगुती सौरऊर्जा ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे या ग्राहकांना घराचे वीजबिल शून्यावर आणणे शक्य होण्याची चिन्हे आहेत.
राज्य वीज नियामक आयोगाने पंचवार्षिक वीज दरवाढ प्रस्तावात घरगुती सौरऊर्जा ग्राहकांना महावितरणच्या नव्या टीओडी मीटर प्रणालीनुसार वीजबिल आकारण्यात येणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या उद्देशानुसार घरगुती सौरऊर्जा ग्राहकांचे वीजबिल शून्यावर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महावितरणने घरगुती ग्राहकाला टीओडी पद्धतीप्रमाणे वीजबिल आकारू नये, अशी मागणी विविध ग्राहक संघटनांनी केली होती. आता आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे हा लढा यशस्वी झाला असून, घरगुती सौरऊर्जा ग्राहकांना टीओडी पद्धत लागू होणार नसल्याचे राज्य वीज नियामक आयोगाने स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारने पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरांवर सौरऊर्जा पॅनेल बसवून त्यांचे वीजबिल शून्यावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यात दिवसभर सूर्यप्रकाशामुळे तयार झालेल्या सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार झालेल्या विजेइतके युनिट ग्राहकाला आता त्याच्या गरजेच्या काळात कधीही वापरता येईल. ग्राहकाने सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार झालेल्या विजेपेक्षा कमी वीज वापरली, तर अर्थातच ग्राहकाला शून्य वीजबिल येणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना सौरऊर्जेद्वारे तयार झालेले युनिट कोणत्याही वेळी वापरता येईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.