
Pune News: इच्छा असूनही पैशांअभावी घराच्या छतावर सौर प्रकल्प बसविण्यात असमर्थ ठरणाऱ्या वीजग्राहकांसाठी केंद्र सरकारने ‘जनसमर्थ’चे बळ देऊ केले आहे. पंतप्रधान सूर्यघर योजनेसाठी एका क्लिकवर ‘जनसमर्थ पोर्टल’द्वारे ९० टक्के कर्ज मिळवता येते आणि ७८ हजारांचे अनुदानसुद्धा. विशेष म्हणजे सौर प्रकल्पासाठी गृहकर्जापेक्षा स्वस्त अगदी ७ टक्क्यांपेक्षा कमी दराने तातडीने कर्ज मिळते. यातून मोहोळ तालुक्यातील एका ग्राहकाने पदरमोड न करता हा प्रकल्प साकारला आहे.
ज्या ग्राहकांचा वीजवापर ३०० युनिटच्या घरात आहे, त्यांच्यासाठी ३ किलोवॅट क्षमतेचा सूर्यघर प्रकल्प पुरेसा आहे. यातून साधारणपणे ३०० ते ३६० युनिट वीज महिन्याला तयार होते. या क्षमतेचा प्रकल्पासाठी २ लाखांच्या आत खर्च येतो. घराची रचना, उंची यामुळे ५ ते १० हजारांचा फरक येऊ शकतो. तर ३ किलोवॅट प्रकल्पाला केंद्र सरकारकडून ७८ हजारांचे अनुदान मिळते.
पीएम-सूर्यघर प्रकल्पासाठी कर्ज हवे असल्यास सर्वप्रथम निवडसूचीतील ठेकेदाराकडून सूर्यघर प्रकल्पाचे कोटेशन घ्यावे. तद्नंतर महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart/ या पोर्टलवर १२ अंकी वीजग्राहक क्रमांक टाकून व ठेकेदाराची निवड करून कोटेशन अपलोड करावे. नोंदणी पूर्ण झाल्याचा एसएमएस दिलेल्या मोबाइल क्रमांकावर प्राप्त होईल.
सूर्यघरची नोंदणी पूर्ण झाल्यावर https://www.jansamarth.in/register पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी. विचारलेली माहिती भरल्यावर विविध राष्ट्रीय बँका व त्यांचे व्याजदर समोर येतील. ग्राहकाने त्याच्या सोयीनुसार बँक व शाखा निवडावी. एसएमएसवर मिळालेला नोंदणीक्रमांक योग्य ठिकाणी टाकून माहिती भरावी. व्हेरिफिकेशन पूर्ण करून बँक कर्ज मंजूर करते. ठेकेदाराने काम पूर्ण केल्यावर महावितरणकडून पडताळणी होते व दिलेल्या बँक खात्यावर काही दिवसांत ७८ हजारांचे अनुदान जमा होते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.