Soil Testing : जमिनीच्या आरोग्य पत्रिकेसाठी माती परीक्षण

Soil Fertility : आपल्या पिकाच्या वाढीमध्ये माध्यम म्हणून माती अत्यंत मोलाची भूमिका निभावते. त्यातील अन्नद्रव्ये आणि खनिजे पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची असतात. त्यासाठी मातीचा नमुना प्रयोगशाळेतून तपासून घेणे गरजेचे असते.
Soil Testing
Soil TestingAgrowon

राहुल इंगोले, अक्षय इंझाळकर, डॉ. नंदकिशोर हिरवे

Soil Health : आपल्या पिकाच्या वाढीमध्ये माध्यम म्हणून माती अत्यंत मोलाची भूमिका निभावते. त्यातील अन्नद्रव्ये आणि खनिजे पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची असतात. त्यासाठी मातीचा नमुना प्रयोगशाळेतून तपासून घेणे गरजेचे असते.

शेतातील मातीच्या परिक्षणासाठी मातीचा प्रातिनिधिक नमुना काढणे, ही प्राथमिक व सर्वात महत्त्वाची बाब आहे. प्रयोगशाळेमध्ये मातीचे परीक्षण करताना रासायनिक विश्‍लेषण करून त्यातील उपलब्ध घटकाची माहिती दिली जाते. त्यात प्रामुख्याने मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे प्रमाण तपासले जाते. त्यानुसार पिकांचे आणि खतांचे अचूक नियोजन करणे सोपे जाते.

माती परीक्षणाचे फायदे ः
- माती परीक्षणामुळे आपल्या जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण समजते.
- पिकांचे योग्य नियोजन करता येते.
- पिकांना शिफारशीप्रमाणे अचूक प्रमाणात खते देता येतात. परिणामी, अतिरिक्त खर्चामध्ये बचत होते.
- संतुलित खत व्यवस्थापनामुळे पिकांची वाढ जोमदार होते.
- जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते.

Soil Testing
Soil Testing : पोशीर धरण प्रकल्‍पाचे होणार माती परीक्षण

माती परीक्षण कधी करावे?
- मातीचा नमुना साधारणतः पिकांची काढणी केल्यानंतर लगेच परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा.
- खते दिलेल्या जमिनीतून किमान तीन महिन्यांपर्यंत मातीचा नमुना घेऊ नये.
- शक्यतो उभ्या पिकातून मातीचा नमुना घेऊ नये. आणि अगदीच गरजेचे असल्यास पिकांच्या दोन ओळींमधला नमुना घ्यावा.
- ओल्या जमिनीतील नमुना घेऊ नये.
- हंगामाच्या सुरुवातीला किंवा त्याही आधी (खरिपात मार्च ते मे अखेर) नमुना घ्यावा.

Soil Testing
Soil Test : उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण काळाची गरज

माती नमुना घेण्याची पद्धत
- नमुना घेण्यासाठी झिगझॅग पद्धतीचा अवलंब करावा.
- शेतातील जमिनीच्या प्रकारानुसार वेगवेगळा नमुना घ्यावा.
- जमीन एकसारखी असल्यास एक हेक्टर क्षेत्रासाठी एक नमुना पुरेसा आहे.
- मातीचा नमुना घेताना मातीच्या पृष्ठभागावरील काडीकचरा व पिकांचे
अवशेष हाताने बाजूला करावेत.
- नमुना घेण्यासाठी टिकाशीच्या साह्याने इंग्रजी ‘V’ आकाराचा खड्डा करावा.
खड्ड्यातील सर्व माती बाहेर काढून टाकावी.
खड्ड्याच्या एका बाजूने दोन ते तीन सेंटिमीटर जाडीची माती लाकडी काठीच्या साह्याने वरपासून खालपर्यंत खरडून घमेल्यात घ्यावी. अशा पद्धतीने शेतात खुणा केलेल्या ठिकाणावरून माती गोळा करून ती एका घमेल्यात जमा करावी.

- घमेल्यात ही माती व्यवस्थित मिसळून, त्यातील मातीतील काडीकचरा दगड बाजूला काढावेत. ती स्वच्छ गोणपाटावर पसरून त्याचा ढीग करावा. या ढिगाचे चार समान भाग करून त्यातील समोरासमोरील दोन भाग काढून टाकावेत. उर्वरित दोन भाग पुन्हा एकत्र करून पुन्हा त्याचे चार भाग करावेत. त्यातील समोरासमोरील दोन भाग काढून टाकावेत. असे साधारणतः अर्धा किलो माती शिल्लक राहीपर्यंत करावे.

- माती ओली असल्यास ती सावलीत वाळवून घ्यावी. स्वच्छ कापडी पिशवीत भरून ती माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावी.
- या कापडी पिशवीवर आणि आतमध्ये चिठ्ठीवर सामान्यतः पुढील माहिती असावी.
शेतकऱ्याचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, सर्वे नं., गट नं., नमुना घेण्याची तारीख, एकूण क्षेत्रफळ, बागायती किंवा कोरडवाहू, मागील वर्षी घेतलेल्या पिकाचे नाव व पुढील वर्षी घेऊ इच्छिणाऱ्या पिकाचे नाव इ.
- हा नमुना आपल्या जवळच्या कृषी विभागाच्या, कृषी विज्ञान केंद्राच्या किंवा खासगी माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा.

राहुल इंगोले, ९४२२७५८९५९
मृद्‍ विज्ञान विभाग, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com