Soil Testing : पोशीर धरण प्रकल्‍पाचे होणार माती परीक्षण

Poshir Dam Survey : राज्य सरकारच्या जलसंपदा विभागातील कोकण पाटबंधारे विभागाने रायगड आणि पालघर जिल्ह्यातील आठ लघु आणि मध्यम धरणांच्या प्रकल्पांसाठी माती परीक्षण व बुडीत क्षेत्र सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत.
Dam Survey
Dam SurveyAgrowon

Badlapur News : राज्य सरकारच्या जलसंपदा विभागातील कोकण पाटबंधारे विभागाने रायगड आणि पालघर जिल्ह्यातील आठ लघु आणि मध्यम धरणांच्या प्रकल्पांसाठी माती परीक्षण व बुडीत क्षेत्र सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. यात कर्जतमधील पोशीर धरणाचा समावेश आहे. तसे झाल्‍यास धरणाच्या कामाला गती मिळण्याची शक्‍यता आहे.

पोशीर धरणात ३५५ दशलक्ष घनमीटर साठ्या ची क्षमता असूनत्यातून बदलापूरसह ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ या शहरांना तसेच कर्जत परिसरातील ग्रामीण भागातसुद्धा पाणीपुरवठा होऊ शकतो. हे पाणी ७२५ दशलक्ष लिटरप्रमाणे परिसरातील शहरांना २८५ दिवस पुरवण्याचे नियोजन आहे.

Dam Survey
Dam Water Level : नऊ धरणांत मृतसाठा

पोशीर धरणासाठी लागणाऱ्या प्रस्तावित २,१९२ हेक्टर जमिनीपैकी ९७१ हेक्टर जमीन वनविभागाची तर १,२२१ हेक्टर जमीन खासगी असेल. कर्जत तालुक्यातील बोरगाव, चाई, चेवणे, उंबरखांड, भोपाली, पेंडरिवबोंडशेत, अशा आठ गावांतील ही खासगी जमीन आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सादर केलेल्या धरणाच्या प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे. त्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला होता. मात्र आता पाण्याचा वापर करणाऱ्या पालिकांनी प्रकल्पग्रस्तांना उपलब्ध जागेप्रमाणे नोकऱ्यांत समाविष्ट करून घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

Dam Survey
Khadakwasla Dam : खडकवासला धरणात येणारे सांडपाणी रोखणार

तीन कोटींची तरतूद

प्रस्तावित पोशीर धरण प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यासाठी एकूण ६४ लाख १८ हजार रुपये मंजूर झाले आहेत. प्रकल्पाला लागणाऱ्या जमिनीच्या माती परीक्षणासाठी ८९ लाख ९३ हजार रुपयांची तरतूद केली आहे. तसेच शिलार या लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी माती परीक्षणासाठी ९८ लाख ४९ हजार रुपये तर, सर्वेक्षणासाठी ४३ लाख ५८ हजार रुपये अशी एकूण तीन कोटींची तरतूद केली आहे.

बदलापूरसह नेरळ, पनवेलला नवसंजीवनी

उल्हास खोऱ्यातून वाहणाऱ्या उल्हासनदीची उपनदी असलेली पोशीर ही नेरळ, वांगणी, बदलापूर पट्ट्यातून सरकणारी नदी आहे. अर्थात या धरणामुळे कल्याण, डोंबिवली आणि भविष्यात पुढच्या दहा वर्षांत पाचवी मुंबई म्हणून विकसित होणाऱ्या बदलापूर, नेरळ, पनवेल या मोठ्या वस्तीच्या शहरांना पोशीर धरण संजीवनी ठरेल, यात शंका नाही.

जलसंपदा विभागाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने, अखेर कोकण पाटबंधारे विभागाने या धरणाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com