Soil Test : उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण काळाची गरज

शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. माती परीक्षणामुळे जमिनीतील कमतरता व पिकांची वाढ होण्यासाठी आवश्यक घटक याबद्दलची माहिती प्राप्त होते.
Soil Testing
Soil TestingAgrowon

वर्धा : ‘शेतकऱ्यांनी माती परीक्षण (Soil Testing) करणे अत्यंत आवश्यक आहे. माती परीक्षणामुळे जमिनीतील कमतरता व पिकांची वाढ (Crop Growth) होण्यासाठी आवश्यक घटक याबद्दलची माहिती प्राप्त होते. या परीक्षणासाठी शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राची मदत घ्यावी,’ असे खासदार रामदास तडस यांनी सांगितले.

कृषी विज्ञान केंद्र सेलपुरा येथे शेतकरी सन्मान संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जीवन कतोरे, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागनाथ जंगवाड उपस्थित होते. शेती करताना नवीन तंत्रज्ञान शिकणे आवश्यक आहे.

Soil Testing
Water Testing : सिंचनाच्या पाण्याची तपासणी आवश्यक

शेतीसोबत उद्योगाची साथ असेल तर वातावरणातील अनियमिततेचा विपरित परिणाम आर्थिक परिस्थितीवर होणार नाही. जमिनीतील आवश्यक सूक्ष्म घटकांचा आराखडा आपल्या जवळ असणे गरजेचे झाले आहे. ज्यामुळे पिकांना अत्यावश्यक पोषणाची कमतरता भासणार नाही. कृषी विज्ञान केंद्र हे आपल्या जिल्ह्यातील एक कृषी विद्यापीठ आहे, शेतकऱ्यांनी कृषी विकास केंद्रातील शास्त्रज्ञांची मदत घेतल्यास निश्चित फायदा होऊ शकतो, असे खासदार तडस म्हणाले.

Soil Testing
Soil Testing : जमीन सुपिकतेसाठी माती परिक्षण आवश्यक

‘‘कृषी क्षेत्रातील विकास देशाच्या उद्योग व सेवा क्षेत्रांच्या विकासासाठी मदतरूप ठरतो. भारतातील जास्तीत जास्त लोक कृषी व्यवसाय करतात. शेती क्षेत्र अधिक सुदृढ होण्याच्या दृष्टीने पी. एम. किसान सम्मान निधी वितरित केला जात आहे,’’ अशी माहिती डॉ. जीवन कतोरे यांनी दिली. ‘‘देशातील कृषी क्षेत्र एक महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपले आहे. येत्या काळात ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता आणि रोजगार निर्मितीमध्ये कृषी क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावण्यास सज्ज आहे,’’ असे कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागनाथ जंगवाड यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या दरम्यान मोठ्या संख्येने ग्रामीण युवक, शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी केले, तर आभार डॉ. सविता पवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. प्रेरणा धुमाळ, डॉ. रूपेश झाडोदे, डॉ. नीलेश वझिरे, डॉ. सचिन मुळे, गजानन म्हसाळ, पायल उजाडे, किशोर सोळंके, दिनेश चराटे, माधुरी डफडे व सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com