Rabi Harvesting : लातूर विभागात रब्बी पिकांची काढणी अंतिम टप्प्यात

Rabi Crop : कृषी विभागातील पाचही जिल्ह्यांत रब्बीतील हरभऱ्याची काढणी पूर्ण झाली असून, गहू, करडई व ज्वारीची काढणी अंतिम टप्प्यात आहे.
Rabi Harvesting
Rabi Harvesting Agrowon

Latur News : कृषी विभागातील पाचही जिल्ह्यांत रब्बीतील हरभऱ्याची काढणी पूर्ण झाली असून, गहू, करडई व ज्वारीची काढणी अंतिम टप्प्यात आहे. शिवाय उन्हाळी भुईमूग व मकाचे पीक रोप व वाढीच्या अवस्थेत आहे.

लातूर विभागात मागील सप्ताहात हवामान उष्ण व कोरडे होते. विभागातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८१३.३८ मि.मी. असून २५ सप्टेंबर पर्यंत ६२९.८४ मि.मी. इतका पाऊस झाला. ता. ३१ आक्टोबरच्या सरासरीच्या ७७ टक्के होता.

वार्षिक सरासरीच्या ७७ टक्के इतका पाऊस झालेला आहे. लातूर विभागातील खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र २७६६९५४ हेक्टर होते. त्या तुलनेत २७ लाख ९६ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रावर १०१ टक्के प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. विभागाचे रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १३ लाख ६३ हजार हेक्टर होते. त्या तुलनेत प्रत्यक्ष पेरणी १५ लाख हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या ११६.७६ टक्के झाली होती.

Rabi Harvesting
Rabi Crop Harvesting : रब्बी पीक काढणीला गती

उन्हाळी पीक ४७ हजार हेक्टरवर उन्हाळी हंगामातील सरासरी क्षेत्र ७१ हजार ७०० हेक्टर असून, प्रत्यक्ष पेरणी ४७ हजार ३८०.८२ हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या ६६.०८ टक्के क्षेत्रावर वर झाली आहे.

रब्बी पीकनिहाय स्थिती

रब्बी ज्वारी ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७१ हजार ८५७ हेक्टर होते. आतापर्यंत ३ लाख ९२ हजार ८१४.५१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी १०५.६४ टक्के होती. पीक सध्या काढणी अवस्थेत आहे. ८० ते ९० टक्के ज्वारीची काढणी पूर्ण झाली आहे.

गहू ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५६ हजार ५१९ हेक्टर होते. त्या तुलनेत १ लाख ३० हजार ४०६.९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ८३.३२ टक्के आहे. पिकाची सध्या काढणी सुरू आहे. ८० ते ९० टक्के गहु पिकाची काढणी पूर्ण झाली आहे.

हरभरा ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ८६ हजार १२४ हेक्टर होते. त्या तुलनेत १० लाख ०९ हजार ०००.१९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी १२८.३५ टक्के आहे. पिकाची काढणी १०० टक्के पूर्ण झाली आहे.

Rabi Harvesting
Rabi Crop Harvesting : रब्बीची काढणी अंतिम टप्प्यात

करडई ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १९ हजार ५३१ हेक्टर होते. त्या तुलनेत ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी १७८.४० टक्के आहे. पीक सध्या पक्वतेच्या ते काढणी अवस्थेत आहे. पिकाची सध्या ९० टक्के पिकाची काढणी पूर्ण झाली आहे.

उन्हाळी पीक स्थिती

उन्हाळी भुईमूग ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ३८८ हेक्टर असून, प्रत्यक्ष २७२७१८.७२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, त्याची टक्केवारी ८६.०९ टक्के आहे. पीक सध्या रोप ते वाढीच्या अवस्थेत आहे.

उन्हाळी मका ः सर्वसाधारण क्षेत्र ८०५७ हेक्टर असून, आतापर्यंत ६४५५हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ८०.१२ टक्के आहे. पीक सध्या रोप ते वाढीच्या अवस्थेत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com