Sitafal Extractor Machine : सीताफळ गर काढणारे यंत्र

Sitaphal Machine : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने ‘पंदेकृवि सीताफळ गर व बीज निष्कासन यंत्र’ विकसित केले आहे.
Sitaphal Extractor Machine
Sitaphal Extractor MachineAgrowon
Published on
Updated on

डॉ.एस.एस.वाणे, डॉ.ए.एस.तारू

Development of Sitaphal Farming : महाराष्ट्रात सीताफळाखालील क्षेत्र वाढले आहे. सीताफळ हे कोरडवाहू फळपीक अत्यंत महत्त्वाचे असून या फळामध्ये अनेक प्रकारची कर्बोदके, खनिजे व जीवनसत्त्वांचा मुबलक साठा असल्यामुळे, आरोग्याच्या दृष्टीने यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गराचे जास्त प्रमाण व कमी बिया असलेल्या जाती या पिकाच्या लागवडीसाठी पसंत केल्या जातात. हे फळ लवकर खराब होणारे असल्यामुळे याची विक्री तत्काळ करावी लागते.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने ‘पंदेकृवि सीताफळ गर व बीज निष्कासन यंत्र’ विकसित केले आहे. या यंत्रामधून काढलेल्या सीताफळ गरामध्ये पाकळ्या अखंड राहत असल्यामुळे गराला बाजारभाव चांगला मिळतो. त्यामुळे छोट्या फळांना बाजारात कमी भावात न विकता त्यांचा गर काढून विकला तर त्याचे चांगले मूल्यवर्धन होईल.

यंत्राची कार्यप्रणाली

यंत्र चालवण्यास सुलभ व हाताळण्यास सोपे आहे. अकुशल मनुष्य हे यंत्र चालवू शकतो. हे यंत्र एका मजुराच्या साहाय्याने चालविता येते.

हे यंत्र ०.५ अश्‍व शक्ती सिंगल फेज विद्युत मोटरवर चालविता येते. सुरुवातीला सीताफळावरील टरफल वेगळे करावे. त्यानंतर मोठ्या चमच्याने बियांसहित गर यंत्राच्या फिडिंगमध्ये टाकावा. यंत्राच्या गर व बीज निष्कासन रोलर या प्रमुख यंत्रणेद्वारे गर व बिया वेगळ्या होतात. ब्रश रोलरद्वारे चांगल्या प्रतीच्या पाकळ्यासहित गर वेगळा केला जातो. तो खालील भागात गर निष्कासनमार्गाने वेगळा केला जातो. दंडागोलाकृती चाळण्यांद्वारे बिया वेगळ्या केल्या जातात.

हा साठविलेला गर सीताफळाचा हंगाम संपल्यानंतर विक्री करता येतो. गर आइस्क्रीम, रबडी, शेक उत्पादकांना विकता येतो.

Sitaphal Extractor Machine
Sitaphal Orchard Success Story : कमी पाण्यातील सीताफळाचा नवले कुटुंबीयांना आधार

वैशिष्ट्ये

यंत्राची क्षमता ७० ते ८० किलो प्रति तास आहे.

यंत्र ०.५ अश्‍वशक्तीच्या सिंगल फेज विद्युत मोटारवर चालते.

हे यंत्र चालवण्यास सुलभ व हाताळण्यास सोपे आहे.

अकुशल मनुष्य देखील हे यंत्र चालवू शकतो.

यंत्राची गरनिष्कासन कार्यक्षमता ९२ ते ९६ टक्के आहे.

यंत्राद्वारे उपलब्ध गरामध्ये ७५ ते ८५ टक्के पाकळ्या राहतात.

Sitaphal Extractor Machine
Sitaphal Fruit Crop Insurance : पेरु, सीताफळ फळपिकांसाठी विमा योजना

यंत्राचे व्यवस्थापन

खरेदीवेळी यंत्राची चाचणी करून घ्यावी.

यंत्राच्या निर्मात्याकडून यंत्राविषयाची माहिती समजून घ्यावी.

यंत्राचे सर्व नट व बोल्ट वेळोवेळी तपासून घ्यावेत.

यंत्राच्या बेल्टचा ताण तपासून घ्यावा.

प्रक्रियासाठी लागणारी सर्व भांडी स्वच्छ धुऊन व कोरडी करून घ्यावीत.

यंत्राचा वापर झाला, की लगेच यंत्र खोलून स्वच्छ धुऊन व कोरडे करून ठेवावे. मुख्यत: रोलर, दंडागोलाकृती चाळण्या स्वच्छ धुऊन व कोरड्या करून ठेवाव्यात.

यंत्राला अर्थिंग आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे.

यंत्राचे फायदे

यंत्रामध्ये गर वेगळा करण्याची प्रक्रिया जलद होत असल्याकारणाने लगेच पॅक करून डिपफ्रिजमध्ये साठवता येतो. त्यामुळे गराचा रंग बदलत नाही.

गर काढण्याच्या प्रक्रियेत मानवी हाताळणी कमी असल्यामुळे प्रत चांगली राहते.

यंत्रामधून गर आरोग्यास पोषक अशा स्थितीत काढला जातो.

यंत्रामुळे कापणी पश्‍चात हानी कमी करता येते.

फळ उत्पादकांनी गर काढून विकल्यास दळणवळणावर खर्च कमी होतो.

काढलेल्या सालीचा उपयोग कंपोस्ट खत म्हणून शेतात करता येईल. तसेच काढलेल्या बिया, बियाणे म्हणून किंवा औषधीनिर्मितीसाठी विकू शकतात.

- डॉ. एस. एस. वाणे, ९४२३४७३६२९

(कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com