Sitaphal Fruit Crop Insurance : पेरु, सीताफळ फळपिकांसाठी विमा योजना

Crop Insurance : मृग बहर-२०२३ मध्ये पेरू फळपिकासाठी ही योजना अधिसूचित जिल्हा व अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते.
Sitaphal Cultivation
Sitaphal CultivationAgrowon
Published on
Updated on

Insurance Scheme : मृग बहर-२०२३ मध्ये पेरू फळपिकासाठी ही योजना अधिसूचित जिल्हा व अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते.

सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्प अंतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र येथे नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल.

पेरू पिकासाठी निवडलेल्या विमा कंपनीमार्फत नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) विमा संरक्षण प्रदान होईल. वय वर्षे ३ पूर्ण झालेल्या उत्पादनक्षम पेरू बागेस विमा संरक्षण राहील.

विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) विमा संरक्षण कालावधी प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (रुपये प्रति हेक्टर)

कमी पाऊस

१५ जून ते १४ जुलै या कालावधीत ७६ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यास रु. १२,०००.

या कालावधीत ७६ मि.मी. पेक्षा कमी पाऊस झाल्यास रु. ३०,०००.

पावसाचा खंड

१५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत सलग १५ ते २१ दिवस पावसात खंड व कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस व त्यापेक्षा जास्त सलग ३ दिवस राहिल्यास रु. १२,०००.

या कालावधीत सलग २१ दिवसांपेक्षा जास्त काळ पावसात खंड व कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस व त्यापेक्षा जास्त सलग ३ दिवस राहिल्यास रु. ३०,०००.

Sitaphal Cultivation
Fruit Crop Insurance : संत्रा, लिंबू द्राक्षासाठी फळपीक विमा योजना

विमा संरक्षण रक्कम - ६०,००० रुपये प्रति हेक्टर.

शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रु. ३००० ते ६००० प्रति हेक्टर. शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता हा सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्क्यांच्या मर्यादेत असतो. मात्र एकूण वास्तवदर्शी विमा हप्ता ३५ टक्क्यांहून अधिक असल्यास त्या अधिक विमा हप्त्यातील ५० टक्के भार शेतकऱ्यांना उचलावा लागतो. विमा हप्ता दर जिल्हानिहाय वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे शेतकऱ्याने भरावयाच्या विमा हप्त्यात जिल्हानिहाय फरक असू शकतो.

या योजनेत अधिसुचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.

पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.

बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा सातबारा, ८ (अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा (Geo Tagging) केलेला फोटो, बँक पासबुकवरील बँक खातेबाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

विमा योजनेत समाविष्ट जिल्हे आणि संबंधित कंपनी

जिल्हे - विमा कंपनीचे नाव व पत्ता

नगर, अमरावती, नाशिक, सोलापूर- रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.

बीड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, सांगली, परभणी, जालना, कोल्हापूर - एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.

बुलडाणा, जळगाव, पुणे, धाराशिव - भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड.

सहभागी होण्यासाठी अंतिम दिनांक - १४ जून २०२३.

एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो.

शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.

मृग बहर-२०२३ मध्ये सीताफळ फळपिकासाठी ही योजना अधिसूचित जिल्हा व अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते.

सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्प अंतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र येथे नोंदविल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल.

सीताफळ फळपिकासाठी निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीस (आर्थिक) विमा संरक्षण प्रदान देईल. वय वर्ष ३ पूर्ण झालेल्या उत्पादनक्षम सीताफळ बागेस विमा संरक्षण राहील.

विमा संरक्षण रक्कम - प्रति हेक्टर रु. ५५,०००.

Sitaphal Cultivation
Crop Insurance Update : अपात्र विमा प्रस्तावांपोटी पावणेचौदा कोटी रुपये जप्त

शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रु.२७५० ते ६३२५ प्रति हेक्टर. शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता हा सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्क्यांच्या मर्यादेत असतो. मात्र एकूण वास्तवदर्शी विमा हप्ता ३५ टक्क्यांहून अधिक असल्यास त्या अधिक विमा हप्त्यातील ५० टक्के भार शेतकऱ्यांना उचलावा लागतो. विमा हप्ता दर जिल्हानिहाय वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्यात जिल्हानिहाय फरक असू शकतो.

या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.

पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.

बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२, ८ (अ) उतारा आणि पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा (Geo Tagging) केलेला फोटो, बँक पासबुकवरील बँक खात्याबाबतची सविस्तर माहिती द्यावी लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग किंवा आंबिया बहरासाठी कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल.

एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो.

शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in शेतकऱ्यांनी उत्पादन योग्य फळपीक नसताना विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्यांचे विरुद्ध कडक कारवाई होऊ शकते. यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनीच योजनेत सहभाग घ्यावा.

- अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.

विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके) विमा संरक्षण कालावधी प्रमाणके (ट्रीगर) व नुकसान भरपाई रक्कम (रुपये प्रति हेक्टर)

पावसाचा खंड

१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर सलग १५ दिवस पावसाचा खंड राहिल्यास रु. ९९००/-

सलग २० दिवस पावसाचा खंड राहिल्यास रु. १६,५००/-

सलग २५ दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसात खंड राहिल्यास रु. ३३,०००/-

जास्त पाऊस

१ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर एका दिवसात ४० मि.मी. पाऊस झाल्यास रु. ८८००/-

सलग दोन दिवस प्रति दिन ४० मि.मी. पाऊस झाल्यास रु. २२,०००/-

योजनेत समाविष्ट जिल्हे आणि संबंधित कंपनी

जिल्हे विमा कंपनीचे नाव व पत्ता

नगर, अमरावती, वाशीम, सोलापूर - रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.

बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, लातूर - एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.

बुलडाणा, जळगाव, नांदेड, पुणे, धाराशिव - भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड

(लेखक कृषी आयुक्तालय, पुणे येथे कृषी सहसंचालक कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com