कष्ट कमी करणाऱ्या बियाणे टोकण यंत्राची निर्मिती

नाशिक जिल्ह्यातील देवारपाडे (ता. मालेगाव) येथील तरुण शेतकरी कमलेश घुमरे यांने बियाणे टोकन उपकरणाची निर्मिती घरगुती वस्तूंच्या साह्याने केली आहे.
कष्ट कमी करणाऱ्या बियाणे टोकण यंत्राची निर्मिती
कष्ट कमी करणाऱ्या बियाणे टोकण यंत्राची निर्मिती

खरीप हंगामात कापूस लागवड ही टोकन पद्धतीने केली जाते. त्यासाठी दरवेळी वाकून बिया टोकाव्या लागतात. यामुळे काम करणाऱ्या व्यक्तींना पाठ, कंबर व गुडघेदुखीचा त्रास होतो. परिणामी कामांचा वेग मंदावतो. शारीरिक व्याधींही जडू शकतात. ही गरज ओळखून  नाशिक जिल्ह्यातील देवारपाडे (ता. मालेगाव) येथील तरुण शेतकरी कमलेश घुमरे यांने बियाणे टोकन उपकरणाची निर्मिती घरगुती वस्तूंच्या साह्याने केली आहे.  शेतीत संशोधक वृत्ती महत्त्वाची असते. वडिलांना शेतीत मदत करत असता कमलेश सातत्याने त्यांचे कष्ट कसे कमी करता येतील, याचा विचार करत असतो. कापूस लागवडीमध्ये बियाणे टोकण करण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्याचे प्रयोग सुरू केले. घरामध्ये उपलब्ध पाइप, नळी, त्यास दोन वेल्डिंग रॉड अशा जुजबी साहित्यातून त्याने यंत्राची निर्मिती केली. त्यासाठी केवळ शंभर रुपयांपर्यंत खर्च आल्याचे कमलेशने सांगितले. या यंत्राने तूर, भुईमूग, मका अशा कोणत्याही बियांची टोकण करणे शक्य होते. कमलेश हा कलासक्त असून, अनेक लघुपटामध्ये अभिनय केला आहे. वडिलांना शेतीत मदत करण्यासाठी नवनवीन उपकरणे, यंत्रे तयार करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्यामध्ये त्याला ‘ॲग्रोवन’च्या वाचनातून नव्या संकल्पना आणि प्रेरणा मिळत असल्याचेे कमलेश सांगतो. कमलेशने दोन वर्षांपूर्वी जुन्या सायकलीचा वापर करून पेरणी, कोळपणी व फवारणी करणारे बहुपयोगी यंत्र तयार केले होते.  टोकण यंत्राची रचना अशी  यंत्र बनविण्यासाठी एक इंच आकाराचा गोलाकार, ३ फूट लांबीचा पाइप वापरला आहे. वरील भागात बियाणे टाकण्यासाठी टाकाऊ बाटलीचे तोंड नरसाळ्याप्रमाणे कापून बसवले. त्यात हाताने एक किंवा दोन बिया (गरजेनुसार) सोडल्या जातात. या पाइपमधून बियाणे खालील भागात येते. येथे एक झडप बसवली आहे. तिथे बियाणे अडकते. टोकण करण्याच्या जागेवर पाइप योग्य खोलीपर्यंत पाइप जमिनीमध्ये रुतवला जातो. त्यातून झडप उघडण्यासाठी वरील भागापर्यंत एक दोरी किंवा तार जोडलेली आहे. ती खेचल्यानंतर झडप उघडली जाते व बियाणे खाली जमिनीत योग्य खोलीवर जाते. बियाणे मातीमध्ये कमी श्रमात योग्य खोलीपर्यंत जाण्यासाठी खालील झडप ही किंचित त्रिकोणी किंवा पक्ष्याच्या चोचीप्रमाणे बनवली आहे. टोकण यंत्र धरण्यासाठी वरील बाजूस दांडा दिला आहे. त्यामुळे यंत्राला स्थिरता येते व हाताळणे सोपे होते. शेजारी बियाणे ठेवण्यासाठी एक डबा जोडला आहे. त्यातून गरजेनुसार मूठ मूठ बियाणे काढून घेऊन वरील भागातील नरसाळ्यातून टाकू शकतो. संपूर्ण यंत्राचे वजन अवघे १ किलो असल्याने हाताळणीमध्ये शेतकऱ्यांवर कोणताही ताण येत नाही. फायदे 

  •   यंत्रामुळे कापूस टोकण प्रक्रियेत सुलभता येते. काम जलद होते. वेळ व मजुरी खर्चात बचत होते. 
  •   जमिनीच्या ओलाव्यानुसार यंत्राचा वापर शक्य. ओल अधिक असताना यंत्राची चोच काढून ठेवता येते.
  •   कपाशीशिवाय तूर, मका, भुईमूग अशा वेगवेगळ्या पिकांच्या टोकणसाठी उपयुक्त.
  •   याच यंत्राने पुढे खतही गाडून देणे शक्य. खते गाडून दिल्याने हवेमध्ये होणारा त्यांचा ऱ्हास कमी होतो.
  • शेतीतील उत्पादन खर्च सातत्याने वाढत आहे. त्यात केलेल्या कष्टाच्या तुलनेत उत्पन्नाचा मेळ बसत नाही. यामुळे कष्ट कमी करणे आणि खर्च जास्तीत जास्त वाचवणे या उद्देशाने माझे प्रयोग सुरू असतात. आपल्या कल्पनाशक्ती व शिक्षणाचा उपयोग वडिलांचे कष्ट कमी करण्यासाठी होत असल्याचा आनंद काही औरच! - कमलेश घुमरे, ७०३०३ ८८२४३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com