Mango Cultivation : आंबे लागवडीत श्रीवर्धन आघाडीवर

Mango Farming : सध्या श्रीवर्धन तालुक्यात २,७५० हेक्टरवर आंब्याची लागवड करण्यात आली आहे.
Mango Cultivation
Mango CultivationAgrowon

Shrivardhan News : रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात आंबे लागवडीसाठी श्रीवर्धन तालुका सरस असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. सध्या श्रीवर्धन तालुक्यात २,७५० हेक्टरवर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. १९९२ पासून रोजगार हमी योजना तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करण्यात येत आहे.

हापूस आंबा आणि कोकणचे एक वेगळेच नाते आहे. या फळाची गोडी, चव, स्वाद, रंग, आकार इत्यादींमुळे येथील आंबे लोकप्रिय आहेत. कोकणातील जांभा दगडाची भरपूर खनिजयुक्त जमीन, अरबी समुद्राची आणि खाड्यांची खारी हवा, भरपूर सूर्यप्रकाश हापूस आंब्याला आवश्यक असतात.

Mango Cultivation
Kesar Mango Management : केसर आंबा बागेत काटेकोर व्यवस्थापनावर भर

त्‍यामुळे उत्तम नैसर्गिक व्यवस्था असल्याने फळांचा राजा हापूस आंबा कोकणात मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. यातून लाखो रुपयांचे उत्पन्न येथील शेतकऱ्यांना मिळू लागले आहे. त्यामुळे गेल्‍या काही वर्षांपासून येथील तरुण उद्योजकासह शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंबा लागवडीकडे वळाला आहे.

मागील २५ वर्षांत हापूस आंब्याच्या शेतीचे तंत्रज्ञान झपाट्याने बदलले आहे. आंब्याची लागवड प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अतिशय आधुनिक पद्धतीने येथील शेतकरी प्रचंड परिश्रम करून हापूस आंब्याची शेती करू लागला आहे.

त्‍यामुळे यंदाच्‍या वर्षी तालुक्‍यात अडीज हजार हेक्‍टर आंब्याचे पीक घेण्यात आले आहे. वर्षाला साधारणपणे पन्नास टन इतके आंब्याचे उत्पन्न घेतले जाते. यंदा अवकाळीचा थोडा परिणाम आंब्याच्‍या पिकावर जाणावला. मात्र उत्पादान चांगले होईल, अशी अपेक्षा शेतकरीवर्गाला आहे.

Mango Cultivation
Mango Crop : वाढत्या उष्णतेमुळे आंबा पीक अडचणीत

दुसऱ्या क्रमांकावर काजूचे उत्‍पादन

तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकावर काजू लागवड तर नारळ आणि सुपारी लागवड केली जात आहे. बाराशे पन्नास हेक्टर क्षेत्रात भातशेती केली जाते. तर पुन्हा गावाकडे येऊन किंवा पडीक जमीन विकत घेऊन तेथे फळबागांची लागवड करण्याचा नवा ट्रेंडही सुरू झाला आहे.

शेतकऱ्यांनी पुढे येणे आवश्यक

शास्त्रीय आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केली तर कधीच तोट्यात येत नाही. शास्त्रीय माहिती, तंत्रज्ञान कृषी विभाग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवीत आहे. मात्र अंमलबजावणी करण्यात शेतकरी पुढे येताना दिसत नाहीत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कमी पाण्यात, आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केली तर हा व्यवसायही फायद्याचा होऊ शकतो, हे आता प्रयोगाने सिद्ध झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com