ShriGuru Paduka Darshan Utsav : श्रीगुरु पादुका दर्शन उत्सव

Article on ShriGuru Paduka Darshan Utsav : ‘सकाळ’ आयोजित ‘श्री फॅमिली गाइड’ प्रोग्रॅम अंतर्गत वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव पार पडला.
ShriGuru Paduka Darshan Utsav
ShriGuru Paduka Darshan UtsavAgrowon

सेवाभावाचा आनंद इतरांनाही मिळू द्या!

New Mumbai : ‘श्री फॅमिली गाइड’ प्रोग्रॅमचा उद्देश आपल्या सर्वांना सद्‍गुरू कृपा मिळावी, हा होता. तो यशस्वी झाला असून, आता सद्‍गुरू कृपेने लोकसेवा, परोपकार आणि सेवाभाव जोडला गेला आहे. त्यातून मिळालेला आनंद आता आपण इतरांना मिळवून द्यायचा आहे, असे आवाहन अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ व ‘विश्व फाउंडेशन’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले यांनी केले.

‘सकाळ’ आयोजित ‘श्री फॅमिली गाइड’ प्रोग्रॅम अंतर्गत वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी डॉ. राजिमवाले बोलत होते. या वेळी व्यासपीठावर ‘श्री एम सत्संग फाउंडेशन’चे प्रमुख पद्मभूषण श्री एम, ‘एपी ग्लोबाले’चे संस्थापक आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार उपस्थित होते.

या वेळी डॉ. राजिमवाले यांनी अनन्य भक्ती म्हणजे काय, ती कशी प्राप्त होते, याबाबत सविस्तर विवेचन केले. भगवद्‍गीतेत भगवंताने अनन्य भक्ताचा मी योगक्षेम चालवतो असे म्हटले आहे, याचा संदर्भ देत ते म्हणाले, की अनन्य भक्तीत संकुचितपणा नसतो, सर्वांप्रती समानत्व आणि एकत्वाची भावना असणे म्हणजे अनन्य भक्ती. परमसद्‍गुरू म्हणतात, की अनन्य भाव येण्यासाठी ईश्वराचे अस्तित्व मान्य करणे व आपल्यात ईश्वर आहे, असा भाव ठेवणे हाच एकमेव मार्ग आहे.

त्यासाठी गुरुशरण जाणे हाच मार्ग आहे. आजच्या कार्यक्रमातून आपण सर्व जण गुरूंना शरण गेलेलो असल्याने जीवनातला पहिला पडाव आपण पार केला आहे. सद्‍गुरूंनी सत्य धर्माला शरण जाण्याचा मार्ग सांगितला आहे. सत्य धर्म म्हणजे सद्‍गुरूंनी उपदेशीत केलेल्या मार्गावरून जाणे. तोच आपला स्वधर्म असतो.

आज आपण सर्वांनी तोही पडाव पूर्ण केला आहे. आपण सर्व जण येथे एकत्र आलो असून आपल्या सर्वांच्या मिळून सत्य धर्माचा संघ झाला आहे. हे सत्याला शरण जाणे, सत्य धर्माला शरण जाणे व त्यासाठी एकत्र येण्याची तीनही कार्ये आपल्या हातून घडल्याने आपल्यात अनन्यभाव निर्माण होणार आहे.

या अनन्यभावामुळे आपल्या जीवनाचा दोर भगवंताने पकडली आहे. अनेक जन्म घेतल्यानंतर जो अनन्यभाव येतो, तो सद्‍गुरूंच्या कृपेने आपल्या सर्वांत निर्माण झाला आहे. सद्‍गुरूंच्या कृपेने आपल्या जीवनात निर्माण झालेला हा आनंद इतरांना द्यायचा आहे. लोकसेवा, परोपकार व सेवाभावाने जीवन भरून टाका. हाच आपल्या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

ShriGuru Paduka Darshan Utsav
Shriguru Paduka Darshan Utsav : दैवी पर्वणीची सांगता !

माझा जन्म जर्मनीत; पण मी भारताची बेटी!

‘श्री फॅमिली गाइड प्रोग्रॅम’च्या चीफ क्युरेटर स्टेफिनी फाईट यांनी मंचावर मनोगत व्यक्त करताना उपस्थितांशी मराठी आणि हिंदीत संवाद साधला. ‘‘नमस्कार, मी स्टेफिनी फाईट. मेरा जन्म जर्मनी मे हुआ है, लेकीन मैं खुद को भारत की बेटी मानती हूं.

दोन दिवस येथे उपस्थित असलेल्या लोकांचा उत्साह पाहून फार आनंद होतोय. गुरू श्री एम माझ्या आयुष्यात आल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. ‘श्री फॅमिली गाईड’ प्रोग्रॅमचे गुढीपाडव्याच्या दिवशी ९ एप्रिलला लाँचिंग केले जाणार आहे. त्यानंतर हिंदी व इंग्रजीत हा प्रोग्रॅम लाँच केला जाईल,’’ असे त्या म्हणाल्या.

‘श्री फॅमिली गाइड’ म्हणजे त्रस्त जीवनशैलीतून मुक्ती

समृद्ध जीवनशैली कशी असावी, हे ऋषिमुनींनी आपल्या ग्रंथांतून मांडले आहे. त्यासाठी कित्येक वर्षे तपश्चर्या केली असून, आजच्या धकाधकीच्या आयुष्यात या जीवनशैलीचे महत्त्व अधिकच अधोरेखित होत आहे. आनंदी जीवनशैलीसाठी मार्गदर्शक असलेला ‘सकाळ’चा ‘श्री फॅमिली गाइड’ प्रोग्रॅम जीवनात सकारात्मकता आणणारा आहे. त्रस्त जीवनशैलीतून मुक्ती मिळविण्याचा तो मार्ग आहे, असे मत गुरुसेवकांनी व्यक्त केले.

पादुका सोहळ्यानिमित्ताने भाविकांना ‘श्री फॅमिली गाइड’ किट उपलब्ध करून देण्यात आले. अध्यात्म शेवटच्या घटकापर्यंत पोहचावे हा ‘फॅमिली गाइड’चा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक जण आपले आयुष्य समाधानी राहावे, यासाठी कोणत्या ना कोणत्या सद्‍गुरूची सेवा करत असतो; परंतु ती योग्य प्रकारे कशी करावी, याचे मार्गदर्शन ‘श्री फॅमिली गाइड’ करत आहे.

निरोगी, स्वस्थ आणि सेवाभावी जीवनासाठी ‘श्री फॅमिली गाइड’ प्रोग्रॅम अतिशय उपयुक्त आहे. एका कार्यक्रमात त्याबाबत माहिती मिळाली होती. आज पादुका दर्शन सोहळ्यात मी ‘श्री फॅमिली गाइड’ घेतले.
यशवंत शिंदे, भाविक
ShriGuru Paduka Darshan Utsav
ShriGuru Paduka Darshan : सुखी जीवन जगण्याची ही वैचारिक क्रांती

भक्तिमय सुरांमुळे समाधीची अनुभूती

श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवानिमित्त दोन दिवस भक्तिभावाने भारावून गेलेल्या वातावरणाची आज सांगीतिक सांगता झाली. सोहळ्याचे साक्षीदार झालेल्या हजारो गुरुसेवकांना प्रसिद्ध संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांच्या सुमधुर सुरांनी मंत्रमुग्ध केले.

श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव सोहळ्यात मंगळवारी ज्येष्ठ गायक हरिहरन यांचा सांगीतिक कार्यक्रम झाला. सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी शंकर महादेवन यांच्या भक्तिगीतांचा भाविकांनी मनमुराद आनंद लुटला. महादेवन यांना पाहण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष ऐकण्यासाठी सकाळपासूनच भाविकांमध्ये उत्सुकता दिसून आली.

कार्यक्रम स्थळी मुंबई, नवी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या गुरुसेवकांनी त्यांची भक्तिगीते ऐकण्यासाठी विशेष उपस्थिती लावली होती. महादेवन यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य संपादक सम्राट फडणीस यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छासह पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले. संगीत सोहळ्याची सुरुवात विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करणाऱ्या ‘एकदंताय वक्रतुण्डाय...’ गीताने झाली. भाविकांनी महादेवन यांच्या सुरात सूर मिसळत केलेल्या ‘ओम नमः शिवाय’च्या जयघोषाने सारा परिसर भक्तिरसात दंग झाला.

सूर, तालाचा अप्रतिम आविष्कार

बासरी, वीणा, तबला आणि शंकर महादेवन यांचे सूर यांचा अप्रतिम आविष्कार उपस्थितांना अनुभवायला मिळाला. अमित पाध्ये (हार्मोनियम), प्रसाद पाध्ये (तबला) आणि प्रीतमदा (गिटार) आणि प्रभाकर (पकवाज) यांची प्रत्येक गाण्यात लाभलेली उत्तम साथ कार्यक्रमाचे वैशिष्ट ठरले.

शिवम महादेवनची सुरेल साथ

‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटातील ‘सूर निरागस हो..’ गाण्यातून शिवम महादेवन याने वडील शंकर महादेवन यांना सुरेल साथ दिली. त्यानंतर ‘मोरया मोरया...’च्या गजरात भाविक हरखून गेले. ‘हर हर हर, शिव भोला भंडारी... हर हर महादेव’ भक्तिगीताच्या तालात भाविक तल्लीन झाले.

भक्तिरसाची भाविकांना अनुभूती

‘कौन कहते है भगवान आते नही...’, ‘माझे माहेर पंढरी...’ इत्यादी भाविकांसाठी समर्पित केलेल्या भक्तिगीतांबरोबर ‘ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माऊली तुकाराम...’, ‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ आणि ‘जय जय राम कृष्ण हरी’ नामाचा गजर शंकर महादेवन यांनी केला.

नवी मुंबईत श्री गुरूंच्या पादुकांचे दर्शन झाले, हे आपले भाग्य आहे. एवढा मोठा श्री गुरूंच्या पादुकांचा दर्शन सोहळा आणि एवढा मोठा आशीर्वाद आपणास मिळत आहे. ते भाग्य या भूमीतून आपल्याला मिळाले आहे.
शंकर महादेवन, संगीतकार-गायक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com