Shriguru Paduka Darshan : श्रीगुरु पादुका दर्शन सोहळा आजपासून

Family Guide Program : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘श्री फॅमिली गाइड’ प्रोग्रामच्या माध्यमातून मंगळवारी (ता. २६) आणि बुधवारी (ता. २७) नवी मुंबईत ‘श्रीगुरू पादुकादर्शन उत्सव’ आयोजित केला आहे.
Shriguru Paduka Darshan
Shriguru Paduka DarshanAgrowon

Mumbai News : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘श्री फॅमिली गाइड’ प्रोग्रामच्या माध्यमातून मंगळवारी (ता. २६) आणि बुधवारी (ता. २७) नवी मुंबईत ‘श्रीगुरू पादुकादर्शन उत्सव’ आयोजित केला आहे. या सोहळ्यात १८ संत आणि सद्‍गुरूंच्या पादुकांचे दर्शन एकाच ठिकाणी होणार आहे. वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये हा दोन दिवसीय सोहळा होणार आहे.

आपल्या देशाला संपन्न आध्यात्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वैभव लाभले आहे. अध्यात्म आणि भावना यांचे अनोखे नाते आहे. आध्यात्मिक गुरूंनी सुदृढ, आरोग्यदायी, समाधानी आणि समृद्ध समाजाची रुजवणूक केली, ती जोपासली आणि पुढे नेली. अशा गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता ‘सकाळ माध्यम समूहा’ने आनंदी जीवनशैलीसाठी मार्गदर्शक ‘श्री फॅमिली गाइड’ उपक्रम सुरू केला आहे.

Shriguru Paduka Darshan
Agriculture Technology : शेती उद्योगाच्या यशस्वितेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी

त्याअंतर्गत सामाजिक, आध्यात्मिक, शारीरिक आणि आर्थिक प्रगती साधण्यासाठी ‘संकल्प ते सिद्धी सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. ‘श्रीगुरू पादुका उत्सव’ त्याचाच एक भाग आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सोहळ्याच्या आयोजनाचे सुरू असलेले कागदावरील काम आता प्रत्यक्षात साकारले जात आहे. सोहळा होणाऱ्या सिडको प्रदर्शन केंद्राला तीर्थक्षेत्राचे स्वरूप आले आहे. महाराष्ट्रातील जुन्या स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना असणाऱ्या ऐतिहासिक मंदिरांप्रमाणे हुबेहूब कलाकृती तिथे साकारण्यात आल्या आहेत.

सोहळ्यात ज्या गुरूंच्या पादुकांचे दर्शन होणार आहे, त्यांच्या मूळ स्वरूपानुसार तटी उभारण्यात आल्या आहेत. ऐतिहासिक कलेची साक्ष असलेल्या आणि कोरीव कामाचा विलक्षण अनुभव देणाऱ्या देवळांचा देखावा उभारण्यात आला आहे.

श्रीगुरू बालाजी तांबे यांच्या आशीर्वादाने होत असलेल्या पादुका दर्शन सोहळ्यात आध्यात्मिक गुरू श्री एम. यांची विशेष उपस्थिती असणार आहे. डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पाच हजार भाविक एकाच वेळी अग्निहोत्र करणार आहेत. ओंकार जप आणि धुनी प्रज्वलन होणार आहे.

Shriguru Paduka Darshan
Agriculture Market : मूग, तूर वगळता इतर पिकांच्या भावात नरमाई

सोहळ्याच्या पहिल्या दिवशी मंगळवारी ठाणे जिल्हा आणि नवी मुंबईतील वारकरी संप्रदायाच्या वतीने हरिपाठ आणि रिंगण सोहळा होईल. दुसऱ्या दिवशी रायगड जिल्हा आणि पनवेल विभागातील वारकरी मंडळी रिंगण सोहळा साकारणार आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण-डोंबिवली आणि रायगड आदींसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी संप्रदाय आणि भाविकांना आपल्या गुरूंच्या चरणाचे दर्शन घेण्याचा सुवर्णयोग प्राप्त होत आहे.

मंत्रमुग्ध करणारा सुरांचा सोहळा

राज्यभरातील विविध देवस्थानांचे प्रमुख आणि मठांच्या विश्वस्तांबरोबरच सर्वच स्तरांतून ‘सकाळ’ने सुरू केलेल्या आध्यात्मिक उपक्रमास शुभेच्छा मिळत आहेत. पादुका उत्सवात भजन आणि कीर्तनाची परंपराही जपली जाणार आहे.

त्यानिमित्त सुविख्यात गायक हरिहरन आणि प्रसिद्ध गायक-संगीतकार शंकर महादेवन यांच्या भक्तिगीतांचा संगीत सोहळाही सायंकाळी रंगणार आहे. २६ मार्चला हरिहरन आणि २७ मार्चला शंकर महादेवन आपल्या सुरांच्या जादूने भाविकांना मंत्रमुग्ध करतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com