Water Scarcity : शिंदखेड्यात ७५ टक्के गावांमध्ये टंचाई

Water Issue : राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात शिंदखेडा तालुक्याचा समावेश असल्याने यंदा तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी ‘वणवण’ फिरावे लागणार आहे.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon
Published on
Updated on

Chimthane News : राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात शिंदखेडा तालुक्याचा समावेश असल्याने यंदा तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी ‘वणवण’ फिरावे लागणार आहे.

तालुक्यात जानेवारीत तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच आतापासून ५० गावांना ५९ विहिरी/ कूपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी ४० गावांना विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. चिमठाणेसह ८५ गाव ग्रीड योजनेचे काम सुरू असल्याने ही योजना तालुक्याची तहान भागविणारी ठरणार आहे.

Water Scarcity
Water Crisis : मराठवाड्यात झपाट्याने वाढते आहे टँकरची संख्या

शिंदखेडा तालुक्यात मार्च महिन्याच्या शेवटी उन्हाचा पारा ४० अंशांपर्यत पोहोचलेला आहे. शिंदखेडा तालुक्यात १४३ महसूल गावे आहेत .शिरपूर महसूल उपविभागीय अधिकारी, शिंदखेडा तहसील, दोंडाईचा अपर तहसीलदार व शिंदखेडा पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयामार्फत पिण्याच्या पाणीटंचाईबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत.

तालुक्यात जानेवारी महिन्या पांसून डाबली, रहिमपुरे व धावडे गावांना टॅकरने पिण्याच्या पाणीचा पुरवठा करण्यात येत आहे. एप्रिल व मे महिन्यात टँकरची संख्या वाढणार आहे. वाडी- शेवाडी मध्य प्रकल्पातून पिण्याच्या पाण्यासाठी अवर्तन सोडण्यात आल्याने बुराई नदी काठावरील २५ गावांचा पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे.

Water Scarcity
Water Scarcity : जुन्नर तालुक्यात नऊ टँकरने पाणीपुरवठा

अधिग्रहित केलेल्या विहिरी

तालुक्यात विहीरी अधिग्रहण करण्यात आले गावे चुडाणे, जोगशेलू, कलमाडी, रुदाणे, खलाणे, सवाई - मुकटी, मेथी, कलवाडे, सुराय, टेंमलाय, सोनशेलू, कर्ले, चौगाव बुद्रुक, धावडे, डाबली, खर्दे, अक्कलकोस, महाळपूर, परसामळ, मांडळ, सार्वे, विटाई, झिरवे, दत्ताणे, मालपूर, चौगाव खुर्द, दरखेंडा, आरावे, अलाणे, वायपूर, कुमरेज, वायपूर, साळवे, चिमठाणे, पिंप्री, दलवाडे (प्र.सोनगीर), कंचनपूर, रहिमपुरे, कामपूर, विखरण, हातनूर, वरूळ- घुसरे, कदाणे, वाघाडी बुद्रुक, वाघोदे, दसवेल, अंजनविहिरे व वाडी या गावांतील विहिरी व कूपनलिका अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.

ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ कृतिआराखडा

उपाययोजना योजना गावे खर्च

लक्ष विहीर/ कूपनलिका घेणे ०२ ०२ ३.००

नळ योजना दुरुस्ती ११ ११ १५१.००

तात्पुरती पूरक १० १० १३२.००

विहीर अधिग्रहण ९२ ९० १३६.६२

विहीर खोल/गाळ काढणे ११ ११ ४०.००

टँकरने पाणीपुरवठा ४० ४० २९५.००

एकूण १६६ १६४ ७५७.६२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com