Cattle Issue: भाकड जनावरांसाठी योजना आणावी 

Maharashtra News: ‘‘सध्या राज्यात भाकड जनावरे व संकरित गाईच्या नर वासराचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. गोवंश खरेदीचा त्रास होत असल्याने गोवंश जातीच्या जनावरांची कुरेशी समाजाने खरेदी-विक्री बंद केलेली आहे.
Cattle Issue
Cattle IssueAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News: ‘‘सध्या राज्यात भाकड जनावरे व संकरित गाईच्या नर वासराचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. गोवंश खरेदीचा त्रास होत असल्याने गोवंश जातीच्या जनावरांची कुरेशी समाजाने खरेदी-विक्री बंद केलेली आहे.

भाकड जनावरे व संकरित गाईची नर वासरे सांभाळताना शेतकऱ्यांवर येणारे आर्थिक संकट पाहता शासनाने यासाठी नवीन योजना आणावी,’’ अशी मागणी शिवआर्मी संघटनेने मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली आहे.

Cattle Issue
Cattle Herdsman: गावधन गुराख्यांचा राज्यात पहिल्यांदाच सन्मान

संगमनेर येथील शिवआर्मी संघटनेचे दत्ता ढगे, सतीश तनपुरे, शिवाजी रहाणे, राहुल ढोमसे, गणेश घोगरे, सुनील कोटकर, गोपीनाथ घुले, मंगेश गुंजाळ यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे, की शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या गरजेनुसार पाळलेली जनावरे जेव्हा भाकड होतात, तेव्हा त्यांचा उपयोग शेतकऱ्यांना उरलेला राहत नाही.

Cattle Issue
Mathura Labhan Cattle Breed : मराठवाड्यातील देखणा गोवंश ः मथुरा लभाण

परंतु सद्यःस्थितीत अशा जनावरांची खरेदी-विक्री पूर्णपणे बंद असल्यामुळे ही जनावरे शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक बोजा बनली आहेत.अगोदरच दुधाला भाव योग्य दर मिळत नाही त्यात या जनावरांचे संगोपन करणे, त्यांची देखभाल करणे हा खर्चिक व वेळखाऊ प्रकार असून, तो सामान्य शेतकऱ्यांना परवडत नाही.

परिणामी अनेकवेळा ही जनावरे रस्त्यावर सोडली जातात, त्यामुळे अपघात, शेतीचे नुकसान आणि अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे शासनाने भाकड जनावरे व नर वासरांची सरकारी खरेदी योजना राबवावी. या जनावरांचा योग्य तऱ्हेने संगोपन करण्यासाठी गोशाळा किंवा शासकीय केंद्रे स्थापन करावीत. शेतकऱ्यांनी सरकारकडे दिलेल्या जनावरांच्या बदल्यात त्यांना बाजारभावानुसार भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com