Team Agrowon
सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन हे संत्रा नगरीत सुरू आहे. येथे विधानभवनावर आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा धडकणार आहे. त्यामुळे हे अधिवेशन इतर प्रश्नांसह युवा संघर्ष यात्रेमुळे गाजताना दिसत आहे.
या युवा संघर्ष यात्रेचा समारोप हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.
याचदरम्यान शरद पवार यांनी साहित्यिक डॉ. श्री. यशवंत मनोहर यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
येत्या २५ नोव्हेंबर रोजी म्हणजेच स्व. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीदिनी हा पुरस्कार दिला जाणार आहे. याबाबतची घोषणा चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२३’ जाहीर झाला असून शरद पवार यांच्या हस्ते दिला जाणार आहे.
याचदरम्यान चांदवड येथे आयोजित कांदा निर्यातबंदी विरोधातील मोर्चात सहभागी होत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
इथे राजकारण नाही, इथे फक्त काळ्या आईची इमान राखून त्याला सन्मानाने जगता येईल एवढेच आपल्याला करायचे आहे आणि ते आपण मिळून करू एवढे सांगतो असे ते शरद पवार म्हणाले.