Maharashtra NCP Leadership: राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड

Shashikant Shinde: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार पक्ष) प्रदेशाध्यक्षपदी आमदार शशिकांत शिंदे यांची निवड झाली.
Shashikant Shinde
Shashikant ShindeAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार पक्ष) प्रदेशाध्यक्षपदी आमदार शशिकांत शिंदे यांची निवड झाली. जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या निवडीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यकारिणीची बैठक झाली.

दोन दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिला होता. तसेच शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र त्यास पक्षातील सर्वच पातळीवरील नेत्यांनी दुजोरा दिला नव्हता. अखेर मंगळवारी (ता. १५) दुपारपासून दीर्घ काळ कार्यकारिणीची बैठक झाली.

Shashikant Shinde
Indian Politics: ‘महाराष्ट्रा’साठी अद्याप ‘दिल्ली’ दूर !

या बैठकीत पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यास कार्यकारिणीने मान्यता दिल्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच जयंत पाटील सात वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते.

२०२२ च्या जुलैमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदारांनी महायुतीशी आघाडी केली. त्यानंतर झालेल्या न्यायालयीन लढाईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले.

Shashikant Shinde
Maharashtra Politics: सुस्तावलेले सरकार, आक्रमक विरोधक

तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे नाव मिळाल्यानंतरही जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष होते. मात्र नव्या नेतृत्वाला संधी द्यावी यासाठी पक्षात सुरू असलेली धूसफूस आणि जयंत पाटील यांच्या महायुतीतील प्रवेशाच्या वावड्या उठत असल्याच तरी पाटील यांच्याकडेच सूत्रे कायम होती.

त्यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे राजीनामा दिला. त्यानंतर शिंदे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. आगामी निवडणुकांमध्ये शशिकांत शिंदे यांचा थेट सामना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी असेल. तसेच जयंत पाटील यांनाही भाजपची ऑफर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संघर्षाच्या काळात शिंदे यांच्याकडे जबाबदारी आल्याने त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com