Sharad Pawar: मतांमध्ये फेरफार करून १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दोघांनी दिली होती; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Election Fraud: विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन माणसं मला भेटायला आले होते आणि त्यांनी १६० जागांवर मतांची फेरफार करून निवडणूक जिंकवण्याची गॅरंटी दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट आज (ता.०९) शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

Pune News: विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन माणसं मला भेटायला आले होते आणि त्यांनी १६० जागांवर मतांची फेरफार करून निवडणूक जिंकवण्याची गॅरंटी दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट आज (ता.०९) शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला. हा खुलासा त्यांनी राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या आरोपानंतर केला आहे.

आज नागपूरात मंडल यात्रेचा शुभारंभ झाला, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी हा धक्कादायक खुलासा केला. शरद पवार म्हणाले की, या दोन माणसांनी मला सांगितले की आम्ही १६० जागांवर मतांची फेरफार करू शकतो. म्हणजे ते मला १६० जागा निवडून आणण्याची पूर्ण हमी देत होते.

Sharad Pawar
Sharad Pawar: आणीबाणीवर सत्ताधाऱ्यांनी टीका करू नये: शरद पवार

त्यावेळी माझ्या मनात निवडणूक आयोगाबाबत काहीही शंका नव्हती. असे लोक भेटायला येत असतात म्हणून मी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. पण नंतर मी या लोकांना राहुल गांधी यांच्याकडे घेऊन गेलो. आम्ही दोघांनीही याबाबत चर्चा केली आणि आम्ही ठरवलं की, अशा कोणत्याही चुकीच्या मार्गाने जाण्याऐवजी जनतेमध्ये जाऊन सरळ मते मागू आणि या लोकांकडे दुर्लक्ष करू.

Sharad Pawar
Sharad Pawar: निवडणुकीत ५० टक्के महिलांना निवडून द्या

आम्ही जनतेच्या विश्वासावरच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी इतर मुद्द्यांवरही आपली भूमिका मांडली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत बोलताना ते म्हणाले की, यावर आता मी ठोस बोलणार नाही. आम्ही याबाबत चर्चा करू आणि पुढे काय ते ठरवू.

तसेच, राहुल गांधी यांनी मतचोरीचे जे आरोप केले आहेत, ते संशयास्पद आहेत. मी स्वतः राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित होतो. निवडणूक आयोगाने या आरोपांना उत्तर द्यावे, असेही पवार यांनी सांगितले.

पवार यांच्या या खुलाशाने विरोधी पक्षांना नवीन मुद्दा मिळाला आहे. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या ऑफर येणे हे निवडणूक यंत्रणेवर शंका निर्माण करणारे आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com