Sharad Pawar: आणीबाणीवर सत्ताधाऱ्यांनी टीका करू नये: शरद पवार

Political Statement: सध्या सत्ताधाऱ्यांची माध्यमांवर नजर असून सत्ताविरोधी लेखनाची दखल याआधी विधायकतेने घेतली जात असे. मात्र सध्या ती दखल गळचेपी करण्यासाठी घेतली जाते.
At the journalist award ceremony
At the journalist award ceremonyAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: ‘‘सध्या सत्ताधाऱ्यांची माध्यमांवर नजर असून सत्ताविरोधी लेखनाची दखल याआधी विधायकतेने घेतली जात असे. मात्र सध्या ती दखल गळचेपी करण्यासाठी घेतली जाते. त्यामुळे आणीबाणीवरून इंदिरा गांधी यांच्यावर टीका करण्याचा अधिकार सत्ताधाऱ्यांना नाही,’’ अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली.

नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव प्रमुख उपस्थित होते. ते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित विविध पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

At the journalist award ceremony
Sharad Pawar: निवडणुकीत ५० टक्के महिलांना निवडून द्या

तसेच ‘ॲग्रोवन’चे मुंबई प्रतिनिधी बाळासाहेब पाटील यांना स्वातंत्र्यसैनिक स्व. माणिकराव देशमुख कृषी पुरस्काराने सन्मानित केले. तर सिनेअभिनेते भरत जाधव यांचा विशेष सन्मान या वेळी करण्यात आला.श्री. पवार म्हणाले, की आणीबाणीच्या काळात काही वृत्तपत्रांनी सरकारविरोधी भूमिका घेतली होती.

At the journalist award ceremony
Sharad Pawar : शेतकरी आत्महत्यांचे आकडे चिंताजनक

सरकारविरोधात भूमिका घेतल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला होता. हा कालखंड संपल्यानंतर इंदिरा गांधी यांनी यथावकाश या कालखंडाबाबत माफी मागितली होती. पुढे लोकांनी गांधी यांच्या चुकीची शिक्षा निवडणुकीत पराभव करून दिली. आता ५० वर्षांनंतर आणीबाणीची आठवण करून दिली जात आहे.

सध्या काही सरकारविरोधी काही वृत्त प्रसिद्ध झाले, की त्याची चिकित्सा होते. त्यानंतर संबंधितांना संपर्क करून गर्भित इशारे दिले जातात. त्यामुळे माध्यमांची ही गळचेपी करणाऱ्यांनी इंदिरा गांधींवर टीका करण्याचा अधिकार नाही.

ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे म्हणाले, ‘‘विरोधक आणि सत्ताधारी हे वैचारिक असण्याचा काळा यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांचा होता. आता काळ खूप कठीण आहे. या काळात पत्रकारांनी कर्तव्याला जागण्याचा काळ आहे.’’

या वेळी ज्येष्ठ संपादक महेश म्हात्रे, अमेय तिरोडकर, अभिजित करंडे, पांडुरंग पाटील, सर्वोत्तम गावस्कर, दिनेश केळुस्कर, सीमा मराठे, भरत निगडे, शर्मिला कलगुटकर यांना विविध पुरस्कांनी सन्मानित करण्यात आले. या वेळी परिषदेचे मुंबई अध्यक्ष राजा आदाटे यांनी प्रास्ताविक केले. मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक, दीपक कैतके, कोषाध्यक्ष पांडुरंग मस्के, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com