Sharad Pawar Kolhapur : शरद पवारांचे हसन मुश्रीफांना आव्हान; म्हणाले लाचारांना जागा दाखवा

Sharad Pawar : सत्तेसाठी अशी लाचारी स्वीकारणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा,’ असे आवाहन ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काल (ता.०३) येथे केले.
Sharad Pawar Kolhapur
Sharad Pawar Kolhapuragrowon
Published on
Updated on

Kolhapur Kagal Politics : ‘कागल तालुक्यातील एका व्यक्तीला आम्ही प्रोत्साहित केले. तुम्ही त्यांना सत्ता आणि सगळं काही दिलं; पण संकटावेळी साथ द्यायची जबाबदारी असताना पैसा आणि सत्तेसाठी लाचारी स्वीकारत आमचे काही जुने सहकारी आमची साथ सोडून गेले. कागलकर बाकी काही सहन करेल; पण उभ्या आयुष्यात लाचारी स्वीकारणार नाही. त्यामुळे सत्तेसाठी अशी लाचारी स्वीकारणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा,’ असे आवाहन ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काल (ता.०३) येथे केले. येथील ऐतिहासिक गैबी चौकात त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला.

रिमझिम पावसात झालेल्या विराट मेळाव्यात शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माढातील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर, आमदार बाळासाहेब पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

पक्षाध्यक्ष पवार म्हणाले, ‘‘सात-आठ महिन्यांपूर्वी केंद्राच्या ईडी व काही लोकांनी चौकशी सुरू केल्यानंतर आमच्या जुन्या सहकाऱ्यांच्या अस्वस्थ झालेल्या कुटुंब आणि भगिनीने जाहीरपणे मागणी केली की, आम्हाला त्रास देण्याऐवजी गोळ्या घाला. ही भूमिका घेण्याऐवजी कुटुंबाला यातना देणाऱ्यांच्या दारात लाचारासारखे ते जाऊन बसले. हा कागलचा इतिहास नाही. या गैबी चौकात अनेक सभा घेतल्या, हजारो लोकांना संबोधित केले; पण आजच्या सभेला नजर जाईल तिकडे माणसंच-माणसं दिसत आहेत. याचा अर्थ आहे, की राज्याच्या हितासाठी परिवर्तन करण्याचा जो निर्णय समरजितसिंह यांनी घेतला आहे, त्याच्या पाठीशी या तालुक्यातील सर्वसामान्य जनता ताकदीने उभी आहे.’’

राज्यात परिवर्तन केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही राज्यातील महिलांवरील अत्याचार वाढलेत. अत्याचार करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणारी पावले टाकण्याऐवजी रस्त्यावर उतरणाऱ्यांवर खटले भरण्याचे काम शिंदे सरकार करत आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की वाऱ्यामुळे मालवणमधील पुतळा कोसळला. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर ६० वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा केला; पण त्याला काही झाले नाही. पण, आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन झालेला पुतळा कोसळला. त्याचा अर्थ पुतळा उभारण्याच्या कामात भ्रष्टाचार झाला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करत असतील, तर अशा माणसांच्या हातात मी महाराष्ट्र देणार नाही. राज्यात परिवर्तन केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्याला तुम्ही साथ द्या, असे आवाहन पक्षाध्यक्ष पवार यांनी केले.

आता साखरेची परिस्थिती गंभीर कृषिमंत्री असताना मी देशाला अन्नधान्याने स्वयंपूर्ण बनविले. आता मोदी सरकारच्या काळात शेतकरी संकटात जाऊ लागला आहे. परदेशातून धान्य आयात करून जगण्याची वेळ आली आहे. तरुणांचा कष्ट करण्याचा अधिकार उद्‍ध्‍वस्त करण्याचे काम सरकार करत आहे. महाराष्ट्रात साखर उत्पादनात कोल्हापूर एक नंबरवर आहे. त्याचे कारण इथली उत्तम कारखानदारी. विक्रमसिंह घाटगेंच्या नेतृत्‍वाखाली याच ठिकाणी चांगला कारखाना चालू झाला. आता मात्र, साखरेची परिस्थिती गंभीर होत आहे.

केंद्र सरकार साखरेबाबत वेगळा निर्णय घेण्याच्‍या तयारीत आहे. सरकारने साखर निर्यातीला बंदी आणली. त्यामुळे दर कमी झाला आणि शेतकरी अडचणीत आला असल्याचे पक्षाध्यक्ष पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar Kolhapur
Sharad Pawar : शरद पवार ३ दिवस कोल्हापूर दौऱ्यावर; राजकीय घडामोडींना वेग, समरजीत घाटगेंचा प्रवेश निश्चित

मंडलिक-कुपेकर यांची आठवण

सन १९८० मध्ये माझ्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले आणि त्यापैकी पाच-सहा जण सोडले, तर इतर आमदार पक्ष सोडून गेले. आमदार नव्हते; पण जिद्द होती. पक्षाची पुन्हा एकदा उभारणी केली. त्यावेळी आमच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी बाबासाहेब कुपेकर आणि सदाशिवराव मंडलिक आले. पुढे राजकारण बदलले. मंडलिक संसदेत, तर कुपेकर विधानसभेत गेले आणि ते कागल, गडहिंग्लजसह कोल्हापूरच्या जनतेने सिद्ध केले. सत्तेसाठी कष्ट करेन; पण लाचार कधी होणार नाही, हे मंडलिक आणि कुपेकर या सहकाऱ्यांनी सिद्ध करून दाखवले. त्यामुळे त्यांची आठवण येते, असे पक्षाध्यक्ष पवार यांनी सांगितले.

आजरा, गडहिंग्लज कारखान्यांना मदत करा

आजरा, गडहिंग्लज येथील साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना मदत करून त्यांचे पुनरुज्‍जीवन करावे. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा निर्णय राज्यात आपले सरकार आल्यानंतर घ्यावा, अशी मागणी समरजितसिंह घाटगे यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com