Ayurvedic Herbs : औषधी गुणधर्मांनीयुक्त सर्पगंधा, तुळस

Health benefits of Serpgandha and Tulsi : त्वचा विकार जसे की सोरायसिस, जास्त घाम येणे आणि त्वचेला खाज सुटणे यांसारख्या समस्यांमध्ये उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे.
Serpgandha and Tulsi
Serpgandha and TulsiAgrowon
Published on
Updated on

Medicinal Plants :

वर्षा चव्हाण, डॉ. दीपाली चाटसे

सर्पगंधा

त्वचा विकार जसे की सोरायसिस, जास्त घाम येणे आणि त्वचेला खाज सुटणे यांसारख्या समस्यांमध्ये उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे.

बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास, सर्पगंधा ही औषधी वनस्पती गुणकारी मानली जाते.

सर्पगंधा या औषधी वनस्पतीचा वापर बऱ्याच वेळा साप, विंचू, सरपटणारे प्राणी आणि इतर विषारी कीटकांनी डंख मारल्यावर प्राथमिक उपचार करण्यासाठी वापरली जाते. मात्र विषारी प्राण्यांनी डंख मारल्यानंतर त्वरित डॉक्टरांना भेटून योग्य औषधोपचार घेणे आवश्यक आहे.

Serpgandha and Tulsi
Medicinal Plants : औषधी वनस्पतींपासून आरोग्यदायी ‘सरस’ उत्पादने

तुळस

आपल्या सर्वांच्या घरासमोर असलेली तुळस अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त असते. तुळस ही बहुगुणकारी वनस्पती म्हणून ओळखली जाते.

तुळशीच्या बियांमध्ये फ्लेवोनाइड आणि फेलोनिक असते. त्याचा शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास उपयोग होतो.

Serpgandha and Tulsi
Medicinal Plants : औषधी वनस्पतींचे गुणधर्म

सर्दी, खोकला यामध्ये तुळशीची पाने चघळल्यास आराम मिळतो.

विविध ॲलर्जी, त्वचा विकार, दातदुखी अशा अनेक समस्यांमध्ये तुळस उत्तमरीत्या काम करते.

रक्तशुद्धीसाठी तुळस गुणकारी मानली जाते.

तुळशीमध्ये असणारे ॲण्टिऑक्सिडंट शरीराला होणाऱ्या फ्री रेडीकल्सच्या प्रभावापासून संरक्षित करते. 

- वर्षा चव्हाण, ७४९८५१९१३१

(सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com