Medicinal Plants : औषधी वनस्पतींचे गुणधर्म

Medicinal Properties of Plants : आपल्या आजूबाजूला अनेक औषधी वनस्पती आहेत. या आरोग्यदायी आणि औषधी वनस्पतींची माहिती आपल्याला असणे अत्यंत आवश्यक आहे.
Medicinal Plants
Medicinal Plants Agrowon
Published on
Updated on

वर्षा चव्हाण

Ayurvedic Plants : आपल्या आजूबाजूला अनेक औषधी वनस्पती आहेत. या आरोग्यदायी आणि औषधी वनस्पतींची माहिती आपल्याला असणे अत्यंत आवश्यक आहे.

सोनामुखी

सोनामुखीची वाळलेली पाने तसेच शेंगा विविध औषधांमध्ये वापरल्या जातात.

सोनामुखीची चवीला कडवट, चिकट असते. त्याचा उपयोग रेचक म्हणून करतात.

सोनामुखी सेवनामुळे पचनशक्ती सुधारून भूक वाढते, चेहऱ्यावरील मुरूम, पुरळ दूर होऊन त्वचेचे आरोग्य उत्तम राखले जाते.

Medicinal Plants
Medicinal Herbs : औषधी रानभाजी : टाकळा

पानांमध्ये सेनोसाइड हा औषधी घटक असतो. सोनामुखीचे पान रक्त शुद्ध करणारे असते. त्याकरिता दररोज त्याचे सेवन करणे गरजेचे आहे.

सोनामुखी ॲण्टीफंगल म्हणून देखील याचा वापर केला जातो.

त्वचारोग दूर करण्यासाठी सोनामुखीचे पान सिरकासहित लावले जाते.

अपचन, अजीर्ण यामुळे झालेल्या पोटदुखीवर सोनामुखीची पाने, हिरडा, बेहडा, आवळकाठी व सैंधवचूर्ण यांचे मिश्रण घेतल्यास कोठा साफ होण्यास मदत मिळते.

Medicinal Plants
Medicinal Plants : औषधी वनस्पती विकासातील खोडे काढा

इसबगोल

इसबगोल वनस्पतीच्या बियांमधील श्‍लेषमल द्रव्यामुळे आणि अल्बुमिन या घटकामुळे त्यास औषधी गुणधर्म प्राप्त झाले आहेत.

इसबगोलामध्ये मधुर, शीत, कफ, पित्त, रक्तातिसार, रक्तपित्त, ज्वरातिसार, प्रमेह, दाह, वीर्यक्षय, ग्राही, इत्यादी गुणधर्म असतात.

डोकेदुखीवर इसबगोल रामबाण उपाय मानले जाते. इसबगोल निलगिरीच्या पानांत वाटून मस्तकास लेप लावावा.

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. परंतु इसबगोलाचे अति सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. त्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या प्रमाणात त्याचे सेवन करणे आवश्यक आहे.

गर्भवती मातांनी इसबगोल सेवन करणे टाळावे.

दमा असल्यास, इसबगोल कोमट पाण्यातून तज्ज्ञांच्या सल्ल्याने सकाळी आणि संध्याकाळी घ्यावे.

वर्षा चव्हाण ७४९८५१९१३१

सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर,

जि. छत्रपती संभाजीनगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com