Mango Crop Insurance : कोकण सोडून इतर भागांतील आंबा पिकासाठी विमा योजना

Hailstorm Protection : गारपीट या हवामान धोक्यापासून आंबिया बहरामधील फळपिकांना विमा संरक्षण दिले जाते. त्यासाठी नियमित विमा व्यतिरिक्त वेगळा विमा हप्ता बँकेत भरावा लागतो.
Mango Orchard
Mango OrchardAgrowon
Published on
Updated on

Mango Crop Management : आंबा पिकासाठी विमा योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात. गारपीट या हवामान धोक्यापासून आंबिया बहरामधील फळपिकांना विमा संरक्षण दिले जाते. त्यासाठी नियमित विमा व्यतिरिक्त वेगळा विमा हप्ता बँकेत भरावा लागतो.

विमा योजना कोकण सोडून इतर भागांतील आंबा पिकासाठी अहिल्यानगर,लातूर, धाराशिव,परभणी, नांदेड, वाशीम, जालना, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या अधिसूचित जिल्हा, तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळात लागू आहे. या जिल्ह्यात शासनामार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर असलेल्या शासकीय हवामान केंद्र आकडेवारीवरून नुकसान भरपाई अंतिम केली जाते.

या योजनेअंतर्गत आंबा पाच वर्ष वय झालेल्या पिकास निवडलेल्या विमा कंपनी मार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) पुढील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.

शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग

योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू शकतात.

पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.

बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेत विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पासबुकवरील बँक खात्याबाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

Mango Orchard
Mango Orchard Management : प्रतिकूल परिस्थितीत आंबा बागेत घ्यावयाची काळजी

एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो, मात्र त्या फळपिकासाठी ते महसूल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी फळपीक लागवड केलेली नसताना किंवा उत्पादन योग्य फळपीक नसताना, दुसऱ्याच्या जमिनीवर किंवा शासनाच्या जमिनीवर, अकृषक जमिनीवर विमा काढून विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्यांचे विरुद्ध कडक कारवाई होऊ

शकते. यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनी योजनेत सहभाग घ्यावा.

शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीवर फक्त विमा घ्यावा.

शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता हा सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्क्यांच्या मर्यादेत असतो. मात्र एकूण वास्तवदर्शी विमा हप्ता ३५ टक्क्यांहून अधिक असल्यास त्या अधिक विमा हप्त्यातील ५० टक्के भार शेतकऱ्यांना उचलावा लागतो. विमा हप्ता दर जिल्हा निहाय वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे शेतकऱ्याने भरवायच्या विमा हप्त्यात जिल्हानिहाय फरक असू शकतो.

गारपीट या हवामान धोक्यापासून आंबिया बहरामधील फळपिकांना विमा संरक्षण दिले जाते. त्यासाठी वरील नियमित विमा व्यतिरिक्त वेगळा विमा हप्ता बँकेत भरावा लागतो.

या योजनेत राज्यात ‍प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरिता एका फळपिकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे (०.१० हेक्टर) आणि उर्वरित विभागासाठी कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र २० गुंठे (०.२० हेक्टर) अशी मर्यादा राहील. जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रती शेतकरी ४ हेक्टर मर्यादेपर्यंत राहील.

सदर फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांनी ई - पीक पाहणी करणे अनिवार्य आहे.

विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधार आधारित पेमेंटसाठी लिंक असावे.

भाडे पट्टीने शेती करत असल्यास भाडे करार नोंदणीकृत असावा.

शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in

या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसुल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.

Mango Orchard
Mango Orchard Management : आंबा मोहोरताना घ्यावयाची काळजी

आंबा (समूह ब) समाविष्ट जिल्हे ः अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, बीड, वाशीम, जालना, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलडाणा

हवामान धोका व कालावधी प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम प्रति हेक्टर रुपये

अवेळी पाऊस

१ जानेवारी ते ३१ मे १) सलग २ दिवस ५ मि.मी. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. ८,५०० देय होईल.

२) सलग ३ दिवस ५ मि.मी. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. २५,५०० देय होईल.

३) सलग ४ दिवस ५ मि.मी. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. ५१,००० देय होईल.

कमी तापमान

१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी

सलग ३ दिवस १० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास

रु. २५,५०० देय होईल.

जास्त तापमान

१ मार्च ते ३१ मार्च

सलग ३ दिवस ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास

रु. ४२,५०० देय होईल.

वेगाचा वारा

१ एप्रिल ते ३१ मे वेगाचा वारा प्रति तास २५ कि.मी. आणि त्यापेक्षा जास्त राहिल्यास रु. ५१,००० देय राहील.(नुकसान भरपाई ही सर्वेक्षण आधारित राहील)

गारपीट

१ फेब्रुवारी ते ३१ मे विमा संरक्षित रक्कम रु. ५७,०००. (नुकसान भरपाई ही सर्वेक्षण आधारित राहील)

आंबा (समूह क) समाविष्ट जिल्हे ः पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा

हवामान धोका व कालावधी प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम प्रति हेक्टर रुपये

अवेळी पाऊस

१ जानेवारी ते ३१ मे १) सलग ३ दिवस ५ मि.मी. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. ८,५०० देय होईल.

२) सलग ४ दिवस ५ मि.मी. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. २५,५०० देय होईल.

३) सलग ५ दिवस ५ मि.मी. व त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास रु. ५१,००० देय होईल.

कमी तापमान

१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी सलग ३ दिवस १० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास रु. २५,५०० देय होईल.

जास्त तापमान

१ मार्च ते ३१ मार्च सलग ३ दिवस ३८ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान राहिल्यास रु. ४२,५०० देय होईल.

वेगाचा वारा

१ एप्रिल ते ३१ मे वेगाचा वारा प्रति तास २५ कि.मी. व त्यापेक्षा जास्त राहिल्यास रु. ५१,००० देय राहील. (नुकसान भरपाई ही सर्वेक्षण आधारित राहील)

गारपीट

१ फेब्रुवारी ते ३१ मे विमा संरक्षित रक्कम रु. ५७,०००. ( नुकसान भरपाई ही सर्वेक्षण आधारित राहील)

टीप : कोकण सोडून इतर भागांतील आंबा पिकासाठी भाग घेण्याचा अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२४

शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता

हवामान धोके विमा संरक्षित रक्कम रु. / हे शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता रु. / हे.

अवेळी पाऊस, कमी/ जास्त तापमान १,७०,००० ८,५००

गारपीट ५७,००० २,८५०

जिल्हे विमा कंपनी

जळगाव, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा, रत्नागिरी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड

जालना फ्यूचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.

छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, परभणी, रायगड, नंदुरबार युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि.

ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातूर, बुलडाणा, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, बीड, वाशीम बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा.

(लेखक कृषी विभागात कृषी संचालक (प्रक्रिया व नियोजन) आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com