Kolhapur Flood
Kolhapur Flood Agrowon

Flood Damage : पूरबाधित क्षेत्राला शास्त्रज्ञांची भेट

Kolhapur Flood : यावर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झाल्याने कासारी नदीकाठच्या जमिनीतील उसावर जास्तीत दिवस पुराचे पाणी साचल्याने मोठे नुकसान दिसून येत आहे.
Published on

Kolhapur News : यावर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झाल्याने कासारी नदीकाठच्या जमिनीतील उसावर जास्तीत दिवस पुराचे पाणी साचल्याने मोठे नुकसान दिसून येत आहे. यावर उपाययोजनांसाठी नुकसानग्रस्त भागाला दालमिया साखर कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी आणि व्हीएसआय पुणेचे शास्त्रज्ञ अधिकारी यांनी पुनाळ, यवलूज, कोतोली, कळे, साळवण, आसुर्ले-पोर्ले, करवीर येथे नदीलगतच्या ऊस क्षेत्र जमिनीला भेट दिली.

शास्त्रज्ञ डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. गणेश कोटगिरे व दालमिया साखर कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी संग्राम पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी को-८६०३२ ऊस व्हरायटीचा मोठ्या प्रमाणात वापर करावा, असे सांगितले.

Kolhapur Flood
Kolhapur Flood : वैभवशाली पंचगंगा काठाला सुतकी कळा

कारण ही ऊस व्हरायटी इतर ऊस व्हरायटीपेक्षा जास्त दिवस पूरबाधित पाण्यात राहू शकते. या व्हरायटीची रोगप्रतिकारशक्ती जास्त असल्याने पूरबाधित क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांचे जास्त नुकसान होत नाही.

बुडालेल्या उसाची वाळलेली व कुजलेली पाने काढावीत, उसाच्या पानावरील तांबेरा पोक्का बोंग व तपकीर ठिपके या रोगांच्या नियंत्रणासाठी ०-०३ टक्के मॅन्कोझेब बुरशीनाशकाचा वापर करावा. जेथे ऊस अंशतः वाळलेला आहे,

Kolhapur Flood
Kolhapur Flood : शिरोळ तालुक्यात पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान वाटप सुरू

अशा पिकांचा खोडवा घ्यावा. त्यासाठी जमिनीलगत छाटणी करावी, खोडवा मशागत, कीड व ती बुरशीनाशक फवारणी त्याचबरोबर संतुलित खतांचा वापर करून हलकी भरणी करावी. एक महिन्यात तुटाळ भरावी.

उपक्रमासाठी एस. रंगाप्रसाद यांची प्रेरणा व शिवप्रसाद देसाई, नितीन कुरूळुपे, प्रसाद मिरजकर, शिवाजी चौगुले, दालमिया फाउंडेशनचे विष्णू गुरवळ यांचे सहकार्य लाभले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com