
Parbhani News: परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलांत मंगळवारी (ता.२२) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. या दोन जिल्ह्यांतील १३ मंडलांत अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यातील ३ मंडलांत १०० मिमीपेक्षा जास्त, तर एका मंडलात २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला.
सुकू लागलेल्या पिकांना पावसामुळे जीवनदान मिळाले असले तरी अतिवृष्टी झालेल्या मंडलातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग,केळी आदी पीकांमध्ये पाणी साचले, जमिनी खरडून गेल्या. उसाचे पीक आडवे झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत,पाथरी, सोनपेठ, पूर्णा तालुक्यातील मंडलात पावसाचा जोर होता. गंगाखेड,पालम तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले.जिल्ह्यात मागील २४ तासांमध्ये सरासरी ४३.८ मिमी तर जुलै महिन्यात सरासरी१२४.२. मिमी पाऊस झाला.
जिल्ह्यात १ जून पासून आजवर ३००.९ मिमी पाऊस अपेक्षित असतांना प्रत्यक्षात २०५.३ मिमी (६८.२ टक्के) पाऊस झाला.हिंगोली जिल्ह्यातील मागील २४ तासांमध्ये सरासरी २९.७ मिमी तर जुलै महिन्यात आजवर सरासरी ११६.२ मिमी पाऊस झाला.१ जून पासून आजवर सरासरी ३३२.६ मिमी अपेक्षित असतांना प्रत्यक्ष्यात २४८.२ मिमी (७४.६ टक्के) पाऊस झाला.
तिवृष्टी झालेली मंडले
परभणी जिल्हा ः बोरी १०६,वाघी धानोरा ६८,चिकलठाणा ८७,मोरेगाव ७९.२५,केकरजवळा ९८,बाभळगाव ९८,हादगाव १०६,कासापुरी २१५,सोनपेठ १३६.
हिंगोली जिल्हा ः अंबा ६५,औंढा नागनाथ ६६.५,साळणा ८२.५, जवळा बाजार ६८.३.
मंडलनिहाय पाऊस (१० मिमीच्यापुढे)
परभणी जिल्हाः परभणी ३५.८,परभणी ग्रामीण २० पेडगाव २२.५,जांब ३०.८,झरी ५६.८,सिंगणापूर ३९.५,पिंगळी २०,टाकळी कुंभकर्ण ५०.८,जिंतूर २५सावंगी म्हाळसा २३.८,बामणी ३४,आडगाव ४४.३,चारठाणा २२,वाघीधानोरा ६८.५,दूधगाव ५६.८,सेलू ५१.३,देऊळगाव गात ३६.३,वालूर ४३,कुपटा २३.८,चिकलठाणा ८७.८,मोरेगाव ७९.३,मानवत ५२,कोल्हा १७.८,कोल्हा १७.८,ताडबोरगाव १७.८,रामपुरी ६२.५,पाथरी ५२,आवलगाव ४९.८,शेळगाव ४९.८,वडगाव ५७.८,महातपुरी १३.५,माखणी १९.८,पिंपळदरी १८.५,रावराजूर १०.३,पूर्णा २१९.८,ताडकळस २९,लिमला ४२.५,कात्नेश्वर २४.५,चुडावा ४०,कावलगाव १७.३.
हिंगोली जिल्हा ः हिंगोली ४६,नरसीनामदेव ३६.३,डिग्रस कऱ्हाळे ३७.३,कळमनुरी ३४.३,वाकोडी ४७.५,नांदापूर ३८,आखाडा बाळापूर २०,डोंगरकडा १६.५,वारंगा ३९.३,वसमत १९.३,हयातनगर १९.३,गिरगाव २२.८,टेंभुर्णी १९.३,कुरुंदा ३३,येळेगाव २७.८,सेनगाव ११.५,गोरेगाव ११.८,आजेगाव ११.८,साखरा २५.३,पानकन्हेगाव १७.३,हत्ता २३.८.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.