ZP Election Maharashtra : अमरावती जिल्ह्यात ‘झेडपी’ची निवडणूक ५९ गटांमध्येच होणार

Amaravati ZIlla Parishad : सर्वोच्च न्यायालयाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षण कायम ठेवून घेण्याचे आदेश दिला आहेत.
ZP Election
ZP ElectionAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : सर्वोच्च न्यायालयाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षण कायम ठेवून घेण्याचे आदेश दिला आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार २०११ च्या स्थितीवर निवडणुका घेण्याचे प्रयोजन असल्याने जिल्हा परिषदेच्या गटांच्या संख्येत कुठलेही बदल होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ‘झेडपी’च्या निवडणुका पूर्वीप्रमाणेच ५९ गटांमध्येच होण्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. याशिवाय पंचायत समितीच्या ११८ गणांमध्ये सुद्धा कुठलेही बदल होण्याची शक्यता नाही.

ZP Election
ZP Election : जिल्हा परिषदेत सदस्य संख्येचे ‘काउंटडाउन’

न्यायालयाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका २०११ च्या स्थितीनुसार घेण्याचे आदेशित केले आहे. मनपामध्ये प्रभागरचनेतील बदलांना भरपूर वाव असला तरी जिल्हा परिषदेत मात्र तसे काहीच नसल्याचे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मध्यंतरी सर्कल रचनेनंतर जिल्हा परिषदेच्या गटामध्ये वाढ होऊन ते ६६ करण्यात आले होते, मात्र त्यानंतर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुन्हा ५९ गटांमध्ये निवडणूक घेण्यात आली होती. आता पुन्हा एकदा २०११ च्या स्थितीवर निवडणुका होणार असल्याने ५९ हे गट कायम राहणार आहेत.

ZP Election
ZP Elections 2025: रावेर येथे सहा गट, १२ गणांची रचना जाहीर

११ ऑगस्टची उत्सुकता

जिल्हा परिषदेच्या गट तसेच गणांच्या रचनेवर जिल्ह्यातून जवळपास २५ जणांनी आक्षेप नोंदविले होते. त्याची पडताळणी आता विभागीय आयुक्त करीत असून ११ ऑगस्ट रोजी या बाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

चांदूररेल्वे तालुक्यात कमी झालेले सर्कल, काही सर्कलमधील गावांच्या सीमारेषा आदींबाबत अनेकांनी आक्षेप नोंदविले होते, मात्र त्यावर आता ११ ऑगस्टला निर्णय होणार आहे. याशिवाय पंचायत समितीच्या गणांबाबतसुद्धा निर्णय अपेक्षित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com