Sanjay Raut : भाजपच्या खासदाराला जनताच तडीपारची नोटीस देईल

Sangli Lok Sabha Election : सांगलीत वेगळे होईल, हे डोक्यातून काढून टाका, एकास एकच लढाई होईल.
MP Sanjay Raut
MP Sanjay RautAgrowon

Samgli News : अब की बार मोदी सरकार नही चलेगी, त्यांना गुजरातला पाठवायचे आहे. आता ‘अब की बार तडीपार’चा नारा देवून सांगलीच्या भाजपच्या खासदाराला जनताच तडीपारची नोटीस देईल, अशी टीका शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केली.

तसेच महाविकास आघाडी राज्यात एक आहे. सांगलीत वेगळे होईल, हे डोक्यातून काढून टाका, एकास एकच लढाई होईल. आघाडीला ४८ जागा जिंकायच्या असून आपला विजय निश्चित आहे, असा विश्वासह यावेळी त्यांनी व्यक्त केला.

सांगली येथील मारुती चौकात महाविकास आघाडीची शुक्रवार (ता. १९) जाहीर सभेत बोलत होते. या वेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे (उबाठा) उपनेते नितीन बानुगडे-पाटील, आमदार अरुण लाड, आमदार सुमनताई पाटील, यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

MP Sanjay Raut
Hatkanangle Lok sabha : भारतीय जवान किसान पार्टीकडून रघुनाथ पाटील हातकणंगले लोकसभेच्या रिंगणात

खासदार संजय राऊत म्हणाले, ‘‘काही लोक स्वातंत्र्य संपवू पाहत आहेत. सांगलीने राष्ट्रासाठी योगदान दिले आहे. देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा सुरू आहे. त्यामुळे क्रांतीची मशाल पेटली आहे. सांगलीची जागा जिंकायची आहे. त्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करू पाहताहेत. पैलवांनी कुस्तीबरोबर राजकारणाचा डाव टाकला आहे. तो यशस्वी होईल, याची मला खात्री आहे.’’

MP Sanjay Raut
Vidarbha Lok sabha 2024 : विदर्भात धाकधूक वाढली; दुपारपर्यंत ४४.१२ टक्के मतदान

आमदार जयंत पाटील म्हणाले, ‘‘नवखा चेहरा आहे. चंद्रहार पाटील यांचे कोणीही राजणकारणात नाही. स्व. अनिल बाबर यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चंद्रहार यांना मदत केल्याने ते निवडून आले. सांगली जिल्हा कुस्तीगिरांवर प्रेम असून त्यांच्या पाठीशी जनता उभी आहे. पुढच्या काळात महाविकास आघाडीचे सर्व नेते येथे येवून आपल्याला मार्गदर्शन करतील.’’

चंद्रहार पाटील म्हणाले, सांगलीला कुस्तीची परंपरा आहे. कुस्तीगिरांनी राजकारणाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्याच्या मुलाला खासदार करा. आपला विजय निश्चित आहे. यावेळी आमदार अरुण लाड, सुमनताई पाटील यांची भाषणे झाली.

‘माझा काहीही संबंध नाही’

सोशल मीडियावर सांगली लोकसभेच्या जागेबाबत माझ्याबद्दल पोस्ट फिरत होत्या. ही जागा राष्ट्रवादीने मागितली नव्हती. ही जागा काँग्रेस आणि शिवसेनेने मागितली. त्यावर वरिष्ठांबरोबर चर्चा करून शिवसेनेला जागा दिली आहे. त्यामुळे या निर्णयाशी माझा काहीही संबंध नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

चंद्रहार पाटील यांचा उमेदवार अर्ज शुक्रवारी (ता. १९) भरला यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, खासदार संजय राऊत, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे (उबाठा) उपनेते नितीन बानुगडे-पाटील, आमदार अरुण लाड उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com