Alphonso Mango : कोल्हापूर जिल्ह्यात पाडव्यानिमीत्त दोन कोटींच्या आंब्यांची विक्री

Mango Rate : एका दिवसात आंब्याची २ कोर्टीची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
Alphonso Mango
Alphonso Mangoagrowon

Mango Season Kolhapur : सध्या आंब्याचा सिझन सुरू झाल्याने बाजारात सगळीकडे हापूस आणि इतर आंब्यांना मोठी मागणी वाढू लागली आहे. दरम्यान गुढीपाडव्यानिमीत्त कोल्हापूर जिल्ह्यात आंब्याची मोठी आवक झाली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापूर बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये कोकणातील हापूस आंब्याची बंपर विक्री झाली. काल जिल्ह्यात विक्रमी आंब्याची विक्री झाली संध्याकाळनंतर बाजारासमितीमध्ये आंबाच संपल्याचे चित्र पहायला मिळाले आहे.

मार्केटमध्ये २००, ५०० रुपये डझन दर होता. चांगल्या आंब्याच्या डझनाचा दर ६०० रुपये डझन असाही होता. दिवसभरात आंब्याची २ कोर्टीची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

आंबा खरेदी करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला त्याच्या आवडीनुसार मनसोक्तपणे आंबा खरेदी करता यावा. प्रतवारीनुसार आंब्याचे दर ठरतील. त्यामध्ये त्या ग्राहकाची कोणतीही फसवणूक होणार नाही, याकडे समितीने पूर्णपणे लक्ष दिल्याची माहिती बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी दिली.

यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काल(ता.०८) सौद्यासाठी कोकणातील हापूस आंब्याचे ११ हजार बॉक्स व २३१ पेट्यांची आवक झाली होती. रायवळ आंब्याचे २०० बॉक्स, तर मद्रास हापूस आंब्याचे ६०० बॉक्स आवक झाली. त्याचा दर ३०० ते ४०० रु. डझन असा राहिला. तसेच १३० किलो तोतापुरी आंब्याची आवक झाली आहे. त्याचा दर २० ते ५० रुपये किलो असा दर होता.

Alphonso Mango
Hapoos Mangoes : आता पोस्टातही मिळणार नैसर्गिक हापूस आंबा

फळ मार्केटमध्ये सकाळी ९ वा. आंब्याचा सौदा सुरू झाला. सकाळपासूनच आंबा खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होती. व्यापाऱ्यांबरोबर ग्राहकांनीही आंबा खरेदी केल्यामुळे डझनामध्ये ५० ते १०० रुपयांनी वाढ झाली. पेटीचा दर १ हजार, १५०० रु. ते ३ हजार रुपये असा झाला. यावेळी मद्रास हापूस आंब्याचे ६०० बॉक्स आवक झाली आहे.

कराड, सातारा, सोलापूरकडून ग्राहक कोकणातून कोल्हापूर मार्केटमध्ये लवकर आंबा आवक होते. त्यामुळे येथील आंबा खरेदी करण्यासाठी कराड, सातारा, सोलापूर येथील घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांना गर्दी केली होती. सोमवारी झालेल्या एकूण आवकेतील ५० टक्के आंबा अन्य जिल्ह्यांतून आलेल्या व्यापाऱ्यांनी खरेदी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com