Water Theft : सोलापूर जिल्ह्यात पाणी चोरी रोखण्यासाठी विशेष पथके

A Separate Team From the District Administration : भविष्यात जिल्ह्यातील पाणी टंचाई भीषण होवू शकते म्हणून पाणी चोरावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आठ जणांचे स्वतंत्र पथक नेमले आहे.
Water Thieves
Water ThievesAgrowon

Solapur News : उजनी धरण सध्या उणे ३७. ५९ टक्क्यांवर असून धरणातील मृतसाठा झपाट्याने संपत आहे. दुसरीकडे भीमा नदीवरील बंधारे, मध्यम प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे पाणी उपसा सुरु आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील पाणी टंचाई भीषण होवू शकते म्हणून पाणी चोरावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आठ जणांचे स्वतंत्र पथक नेमले आहे. त्यात महसूल, महावितरण, पोलिस व महापालिकेचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी आहेत.

शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात २५ मार्च रोजी उजनी धरणातून पाणी आले होते. अवघ्या १२ दिवसांत बंधाऱ्याची पाणीपातळी एक ते सव्वामीटरने खाली गेली आहे. उन्हाची तीव्रता व बाष्पीभवन, कर्नाटकातील शेतकऱ्यांकडून पाणी उपसा, बंधाऱ्याची गळती, अशी त्याची कारणे आहे. त्यामुळे आता १० मे दरम्यान पुन्हा उजनीतून सोलापूर शहरासाठी भीमा नदीद्वारे पाणी सोडावे लागणार आहे.

Water Thieves
Agriculture Irrigation : ‘डिंभे’च्या उजव्या कालव्याला पाणी सोडल्याने शेतकरी सुखावला

त्यानंतर मात्र, सोलापूर शहराचा पाणीपुरवठा आणखी काही दिवस लांबू शकतो, असा अंदाज महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. त्यामुळे आता जिल्हा व महापालिका प्रशासनाचे संपूर्ण लक्ष उजनी धरण व औज बंधाऱ्यावर आहे.

कलबुर्गी जिल्हाधिकाऱ्यांनी मागितले उजनीतून पाणी

उजनी धरणातील मृतसाठा आता ४३.५० टीएमसीवर आला असून धरणावरील पाणीपुरवठ्याच्या योजना, जलाशयातून शेतकऱ्यांचा पाणी उपसा, बाष्पीभवनामुळे आठ-दहा दिवसाला एक टीएमसी पाणी संपत आहे. धरणातील मृतसाठ्यात अंदाजे सहा टीएमसीपर्यंत गाळ आहे. १० ते १५ मे दरम्यान उजनीतून पुन्हा सोलापूरसाठी भीमा नदीतून सहा-सात टीएमसी पाणी सोडावे लागेल. पाऊस लांबल्यास जूनमध्ये जिल्ह्यातील पाणी टंचाई भीषण होवू शकते. त्यामुळे कर्नाटकतील कलबुर्गीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उजनीतून साधारणत: पाच टीएमसी पाणी सोडण्याची केलेली मागणी जिल्हा प्रशासनाने फेटाळली आहे.

Water Thieves
Agriculture Research : जनुकीय संपादन : क्रांतीकारी संशोधन

कर्नाटककडून पाणी उपसा, जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र

कर्नाटकचे शेतकरी औज बंधाऱ्यातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा करतात. त्यामुळे उजनीतून सोलापूरसाठी सोडलेले बंधाऱ्यातील पाणी काही दिवसांतच संपत आहे. त्यामुळे कर्नाटकातील शेतकऱ्यांकडून होणारा पाण्याचा उपसा थांबवावा, अशी विनंती सोलापूर महापालिकेने विजयपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच महसूल विभागानेही बंधाऱ्याजवळील वीजपुरवठा काही तास कमी करावा, असे पत्र पाठविले आहे. त्यानुसार विजयपूर जिल्हाधिकाऱ्यांनी बंधारा परिसरातील वीजपुरवठा सहा तास केला आहे.

भीमा नदीवरील बंधाऱ्यांचा परिसर सोडून उर्वरित भीमा नदी काठावरील वीजपुरवठा सध्या सहा तास करण्याचा निर्णय झाला आहे. संभाव्य पाणी टंचाईचा अंदाज घेऊन पाणी चोरी रोखण्यासाठी विशेष पथक देखील नेमले आहे.
अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी, महसूल, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com