Hapoos Mangoes : आता पोस्टातही मिळणार नैसर्गिक हापूस आंबा

sandeep Shirguppe

आंबा सीझन

सध्या आंब्याचा सीझन सुरू झाला आहे. यापार्श्वभूमीवर पोस्ट कार्यालयात तसेच पोस्टाद्वारे घरपोच देवगड हापूस आता नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

Hapus Mangoes | agrowon

पोस्टात आंबा मिळणार

कोल्हापूर जिल्ह्यातील निवडक कार्यालयांत ही सुविधा देण्यात येणार आहे. याकरिता आगाऊ नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

Hapus Mangoes | agrowon

देवगड हापूस आंबा

कोकणाचा राजा अस्सल देवगड हापूस आंबा निवडक टपाल कार्यालयांच्या ठिकाणी तो विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Hapus Mangoes | agrowon

'शेतकरी ते थेट ग्राहक'

'शेतकरी ते थेट ग्राहक' या संकल्पनेद्वारे दहिबाब, देवगड येथील आंबा उत्पादक श्रीधर ओगले यांच्यासोबत टपाल विभागाने करार केला आहे.

Hapus Mangoes | agrowon

'जीआय टॅग'

ओगले यांच्या बागेतील आंबा फळास 'जीआय टॅग' मानांकन आहे.

Hapus Mangoes | agrowon

नैसर्गिक आंबा

नैसर्गिक पद्धतीने, कोणत्याही रासायनिक पद्धतीच्या वापराशिवाय पिकवलेला हा आंबा ग्राहकांना मिळणार आहे.

Hapus Mangoes | agrowon

मुख्य पोस्ट

कोल्हापूर शहरातील मुख्य पोस्ट कार्यालय, शनिवार पेठ पोस्ट ऑफिस, आरएमएस पोस्ट ऑफिस, प्रतिभानगर पोस्ट ऑफिस.

Hapus Mangoes | agrowon

इचलकरंजी

फुलेवाडी पोस्ट ऑफिस यासह इचलकरंजी हेड पोस्ट ऑफिस, जयसिंगपूर पोस्ट ऑफिस, गांधीनगर पोस्ट ऑफिस.

Hapus Mangoes | agrowon

गडहिंग्लज

गडहिंग्लज मुख्य डाकघर येथे ग्राहकांना नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केल्यानंतरच आंबा पेटीच्या डिलिव्हरीची तारीख कळविण्यात येणार.

Hapus Mangoes | agrowon

नोंदणी असणाऱ्यांनाच आंबा

नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच प्राधान्याने आंबा देण्यात येणार असल्याचे टपाल विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

Hapus Mangoes | agrowon