Summer Crop
Summer CropAgrowon

Summer Cultivation : मंगरुळपीरला उन्हाळी पीक लागवड वाढली

Summer Crop Update : मंगरूळपीर या तालुक्यात रब्बी पाठोपाठ उन्हाळी पिकांच्याही क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.
Published on

Washim News : मंगरूळपीर या तालुक्यात रब्बी पाठोपाठ उन्हाळी पिकांच्याही क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे रब्बी हंगामात सरासरीच्या दीडपट क्षेत्रात ज्वारीची पेरणी झाली होती, तर उन्हाळी हंगामात सरासरीच्या तिपटीहून अधिक क्षेत्रात शेतकऱ्यांनी ज्वारीची लागवड केली. या हंगामात ३५५ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. पोषक वातावरणामुळे हे पीक चांगले जुळून आले.

मंगरुळपीर तालुक्यात सरासरी १०५८.३० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी पिकांची पेरणी अपेक्षीत होती. प्रत्यक्षात या तालुक्यात १४२६ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी पिकांची पेरणी झाली. तालुक्यात नोव्हेंबर २०२३ च्या अखेर झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे जलस्रोतांच्या पातळीत वाढ झाली. परिणामी शेतकऱ्यांना पिकांच्या सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. त्यामुळेच तालुक्यात रब्बी आणि उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

Summer Crop
Summer Sowing : उन्हाळी तृणधान्यांची १५१८ हेक्टरवर पेरणी

यंदाच्या उन्हाळी हंगामात ज्वारीसह मूग, भुईमूग, तीळ, उडीद, मका आदी पिकांची मंगरुळपीर तालुक्यात पेरणी झाली असली तरी त्यात उन्हाळी मूग, उन्हाळी भुईमूग आणि उन्हाळी ज्वारीचे क्षेत्र लक्षणीय आहे. उन्हाळी हंगामात सरासरी ९७.९० हेक्टरवर ज्वारीची पेरणी अपेक्षीत असताना ३५५ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. हे प्रमाण साडे तीन पट अधिक आहे. पोषक वातावरण आणि मुबलक पाण्यामुळे ही उन्हाळी पिके आता चांगलीच बहरलीसुद्धा आहेत.

रब्बीत झाली होती १७८.६१ टक्के पेरणी

पावसाळ्यात मंगरुळपीर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे सिंचनासाठी पुरेसे पाणीही असल्याने या तालुक्यात रब्बी पिकांची पेरणीही लक्षणीय झाली होती. तालुक्यात सरासरी ९७९०.७७ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी अपेक्षीत असताना १७४८७ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती. हे प्रमाण सरासरीच्या १७८.६१ टक्के होते.

Summer Crop
Summer Sowing : पाच जिल्ह्यांत अपेक्षित क्षेत्रावर उन्हाळी पेरणी नाही

उन्हाळी पिकांचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

भुईमूग ५९४.००

ज्वारी ३५५.००

मूग २६९.९०

तीळ ९३.००

मका ६६.००

सोयाबीन १६

उडीद ०८

उन्हाळी भुईमूगाचे क्षेत्र सर्वाधिक

तालुक्यात यंदा उन्हाळी ज्वारीच्या पेरणीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत असले तरी क्षेत्राचा विचार करता मंगरुळपीरमध्ये उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. तालुक्यात उन्हाळी भुईमुगाची ५९४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com