Soybean Seed Production : सुधारित तंत्र वापरातून यशस्वी सोयाबीन बीजोत्पादन

Agriculture Technology : सातारा जिल्ह्यातील फडतरवाडी येथील अनिल वसंतराव काटे यांनी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन व अभ्यास यातून सुधारित तंत्र पद्धतीने सोयाबीन बीजोत्पादन करण्यास सुरुवात केली.
Soybean
SoybeanAgrowon
Published on
Updated on

Farmer Success Story : सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यातील फडतरवाडी येथील अनिल वसंतराव काटे यांची प्रगतिशील शेतकरी अशी ओळख आहे. वडिलोपार्जित १८ एकर जमीन आहे. सातत्याने नवनवीन प्रयोग करण्याची त्यांची धडपड असते. दरवर्षी आठ ते १० एकर क्षेत्रात ते सोयाबीन घेतात.

बीजोत्पादनावर त्यांचा भर असतो. रब्बीत हरभरा आणि खपली गहू तर आठ एकरांत आडसाली उसाची लागवड असते. पूर्वी पारंपरिक व्यवस्थापनातून हाती फारसे काही राहात नसे. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून शेतीला आधुनिकतेची जोड देत सुधारित व्यवस्थापनाचा अवलंब त्यांनी सुरू केला.

सुधारित पद्धतीची शेती

-काटेकोर पाणी नियोजनासाठी सर्व पिकांसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जातो.

-काटे सोयाबीन बीजोत्पादन करतात. त्यामुळे दर्जेदार बियाणे तयार करण्यासाठी व्यवस्थापनही तसेच करण्यावर भर असतो.

-दरवर्षी आठ ते दहा एकर क्षेत्र असते. त्या अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), आघारकर संशोधन संस्था (पुणे) आदींकडील विविध वाणांची निवड केली जाते. मागील हंगामात केडीएस-९९२ (फुले दूर्वा), केडीएस-७५३ (फुले, किमया), आरव्हीएसएम -११३५, आरव्हीएसएम- १४६० व आरव्हीएसएम- १४०७ हे वाण घेतले होते.

Soybean
Success Story : पुरंदर तालुक्यातील मनीषा कामथे यांनी तयार केला दर्जेदार मसाल्यांचा ब्रॅण्ड

-लागवड पाच फुटी रुंद गादीवाफ्यावर (बेड) असते. या बेडवर तीन ओळी सोयाबीनच्या लावण्यात येतात. बेडच्या दोन्ही बाजूंना सऱ्या तयार होतात. टोकण करताना दोन झाडांतील अंतर ठिबक ड्रीपरच्या प्रत्येकी एक फुटांवरील छिद्रानुसार सुमारे नऊ इंच राखले जाते. टोकण पद्धतीत एकरी १३ ते १४ किलो, तर पेरणीसाठी १७ किलो बियाणे वापरण्यात येते.

सुधारित तंत्र लागवड पद्धतीचे झाले पुढील फायदे

- बियाणे बचत व त्यावरील खर्चात मोठी बचत.

-बेड व बाजूला दोन सऱ्या या पद्धतीमुळे शेतात फिरण्यासाठी तसेच तणनाशक वा कीटकनाशक फवारणीसाठी मोकळी, हवेशीर जागा उपलब्ध झाली.

वेळोवेळी पिकाची निगराणी व निरिक्षण शक्य झाले. याद्वारे फवारणी वेळेत व योग्यप्रकारे शक्य झाली. पीकवाढीच्या अवस्थेत १९-१९- १९, १२- ६१- ० व १३- ०- ४५ या विद्राव्य खतांचा वापर केला.

Soybean
Success Story : वसमत तालुक्यातील अडकिणे कुटुंबाची एकीमुळे शेती झाली यशस्वी

-सूर्यप्रकाश भरपूर व योग्य प्रमाणात मिळाल्याने पिकाची वाढ एकसारखी झाली.

-फुटवे चांगले आले. फूलधारणा चांगली होऊन शेंगांचेही प्रमाण चांगले आले.

-ठिबकद्वारे ओलित केल्यामुळे पावसात खंड पडल्यास पाणी देता आले. पाऊस जास्त पडल्यास अतिरिक्त पाणी सरीत जमा होऊन त्याचा निचरा करता आला. पिकाचे नुकसान टाळता आले.

-कमी पावसाच्या स्थितीत सरीतील ओल टिकून राहिल्याने म्हणजेच मूलस्थानी जलसंवर्धन झाल्याने

पिकाला पाण्याचा ताण बसला नाही.

-शेतात वाफसा स्थिती राखता आली. प्रकाशाची किरणे जमिनीपर्यंत पोहोचल्यामुळे तसेच आर्द्रता योग्य प्रमाणात राखली गेल्याने किडी-रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी राहिला.

उत्पादन व बियाणे विक्री

काटे यांना सुधारित लागवड पद्धतीतून एकरी १३ ते १७ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.

एकरी १७ किलो बियाणे वापर व प्रति किलो १२० रुपये दर गृहीत धरल्यास हा खर्च २०४० रुपये येतो. तर जुन्या पद्धतीत एकरी ३० किलो बियाणे वापरल्यास हा खर्च ३६०० रुपये येतो. म्हणजेच सुधारित पद्धतीत १५६० रुपयांची बचत होते.

काटे यांच्याकडील बियाणे शेतकरी घेऊन जातात. त्याचप्रमाणे स्थानिक माळेगाव येथील साखर कारखान्याकडूनही बियाणे घेण्यात येते. किलोला ९० ते १२० रुपये दर त्यास मिळतो. काटे म्हणाले की टंचाईच्या काळात एकेवर्षी या बियाण्याला २५० रुपयांपर्यंतही दर मिळाला होता.

Soybean
Success Story : संगमेश्वर तालुक्यातील संतोष भडवळकर यांनी शेतीमध्ये मिळवली स्वयंपूर्णता

अन्य शेतीत प्रावीण्य

सोयाबीनसह हरभरा पिकाच्या बीजोत्पादनातही काटे यांनी कौशल्य मिळविले आहे. मागील वर्षी चार टन हरभरा बियाणे गुजरातमधील एका कंपनीने प्रति किलो १०० रुपये दराने खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले.

आडसाली उसाची शेतीला जोड असून एकरी ७५ ते ८० टन उत्पादन मिळते. या वर्षी पपई लागवड केली आहे. कृषी विज्ञान केंद्र, बारामती, आघारकर इन्स्टिट्यूट यांचे मार्गदर्शन त्यांना मिळते. आई-वडील, पत्नी व मुलगा असा त्यांचा परिवार असून संपूर्ण चरितार्थ हा शेतीवरच अवलंबून आहे.

‘ॲग्रोवन’मुळे घडला शेतकरी- शास्त्रज्ञ संवाद

अमरावती येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक (कृषिविद्या) जितेंद्र दुर्गे यांचे लेख ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध होतात. ते वाचून काटे त्यांच्यासोबत संवाद साधू लागले. आपल्या प्रयोगांची छायाचित्रे वेळोवेळी पाठवू लागले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, अभ्यास व प्रयोगांचे प्रयत्न यातून सोयाबीन बीजोत्पादन शेती यशस्वी झाल्याचे काटे यांनी सांगितले.

संपर्क ः अनिल काटे, ९९२३३३८०८२

जितेंद्र दुर्गे (सहयोगी प्राध्यापक), ९४०३३०६०६७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com