Sugarcane Labor
Sugarcane LaborAgrowon

Sugarcane Labor : सातारा जिल्ह्यात ऊस तोड मजूर संख्येत वाढ

Sugarcane Season : कर्नाटक तसेच इतर जिल्ह्यांतील काही कारखान्यांचा गाळप हंगाम संपत आल्याने या कारखान्यांचे मजूर, यंत्रणा जिल्ह्यात येऊ लागले आहेत.
Published on

Satara News : कर्नाटक तसेच इतर जिल्ह्यांतील काही कारखान्यांचा गाळप हंगाम संपत आल्याने या कारखान्यांचे मजूर, यंत्रणा जिल्ह्यात येऊ लागले आहेत. यामुळे जिल्ह्यातील ऊस तोडणीस गती येण्यास मदत होणार आहे.

केंद्र सरकारकडून साखर निर्यातीस परवानगी मिळाल्याने कारखान्यांसह शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे हंगाम एक महिना पुढे गेल्याने अनेक साखर कारखान्यांची तोडणी यंत्रणा विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम कारखान्यांच्या गाळपावर दिसून येत आहे.

Sugarcane Labor
Women Sugarcane Cutter Labor : अनपेक्षित सन्मानामुळे उसतोड मजूर महिला भारावल्या

अनेक कारखान्यांचा अजूनही आडसाली हंगाम सुरू असल्याने ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून एक कोटी टनांवर गाळप होत आहे. या वेळी उसाचे क्षेत्र कमी असल्याने कोटींची उड्डाणे घेणे शक्य होणार नसल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. ऊस तोडणी विस्कळीत झाल्यामुळे कारखाने हैराण झाले होते.

मात्र आता कर्नाटकातील अनेक कारखान्यांचा गाळप हंगाम संपल्यामुळे येथील ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल होऊ लागल्या आहेत. यामुळे गाळप हंगामाला गती येण्यास मदत होणार आहे. ऊसाला तोड येणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Sugarcane Labor
Sugarcane Cutting Labor : ऊस तोडणी मजुरांसाठी आरोग्य तपासणी

उद्दिष्ट गाठण्यासाठी धडपड

राज्यभरात उसाचे क्षेत्र घटल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस कारखान्यांनी उद्दिष्टे गाठण्यासाठी सातारा जिल्ह्यात ऊस नेण्यास वेग आला आहे. कऱ्हाड, सातारा, पाटण, खटाव तालुक्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखान्याचे मजूर दाखल झाले आहेत.

साखर निर्यातीच्या निर्णयामुळे आणखी दर वाढ असल्याने कारखान्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बाहेरून आलेल्या कारखान्याचा दर थोडा जास्त असल्याने त्यांना ऊस देण्याकडे कल असल्याने जिल्ह्यातील कारखान्यांचा पुढील महिन्यात ऊस कमी पडण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांना उद्दिष्ट गाठणे कठीण होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com