Sugarcane Cutting Labor : ऊस तोडणी मजुरांसाठी आरोग्य तपासणी

Health Camp For Labor : या शिबिरात २१७ महिला व १९१ पुरुषांची तपासणी करण्यात आली तसेच दोन वर्षांच्या आतील अठरा बालकांचे गरजेनुसार लसीकरण करण्यात आले.
Health Camp
Health Camp Agrowon
Published on
Updated on

Baramati News : येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोडीसाठी आलेल्या मजुरांसाठी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये याचा ४०८ स्त्री-पुरुषांनी लाभ घेतला. तसेच १८ मुलांचे रखडलेले लसीकरण आणि गर्भवती मातांची तपासणी करण्यात आली.

पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व सोमेश्वर कारखाना यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिराचे उद्‍घाटन कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर होते. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, संचालिका प्रणिता खोमणे, संचालक जितेंद्र निगडे, किसन तांबे, सरपंच हेमंत गायकवाड, उपसरपंच गणेश जाधव, शेती अधिकारी बापूराव गायकवाड, सतीश काकडे उपस्थित होते.

Health Camp
Sugarcane Labor Voting : ऊस तोड कामगार मतदानापासून राहणार वंचित

या शिबिरात २१७ महिला व १९१ पुरुषांची तपासणी करण्यात आली तसेच दोन वर्षांच्या आतील अठरा बालकांचे गरजेनुसार लसीकरण करण्यात आले. ह्रदयरोगतज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आदींकडून शिबिरामध्ये सामान्य आजारांसह मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, दंत, मौखिक, नेत्र, कान-नाक-घसा अशा तपासण्या करण्यात आल्या. शुगर, ब्लडप्रेशर, ई.सी.जी. मोफत तपासण्यात आले.

Health Camp
Women Sugarcane Cutter Labor : अनपेक्षित सन्मानामुळे उसतोड मजूर महिला भारावल्या

औषधवाटप आणि सल्लाही देण्यात आला. कारखान्याकडून महिलांना हिमोग्लोबीन वाढीसाठी चिक्की वाटप करण्यात आले. हिमोग्लोबीन वाढीबद्दल महिलांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानदीप राजगे, डॉ. प्रज्ञा खोमणे, डॉ. कर्णवीर शिंदे यांच्यासह होळ आरोग्य केंद्राच्या सर्व आरोग्यसेवकांनी तपासणीचे काम केले. ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी सुरू असलेल्या कोपीवरची शाळा प्रकल्पातील शिक्षक-कार्यकर्ते व आशा सेविका व सोमेश्वर कारखान्याचे शेती विभागाचे कर्मचारी यांनी संयोजन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com