
Nashik News : उदरनिर्वाहासाठी अनेक ऊस तोड मजुरांचे कुटुंब ऊसपट्ट्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल होत असतात. सकाळी लवकर सुरू होणारा कामाचा व्याप आणि जगण्याचा संघर्ष सोबतीला असतो, असे कष्टप्रद असणाऱ्या या घटकांमध्ये महिला तारेवरची कसरत करतात.
साखर उद्योगात महत्त्वाचा भाग असलेल्या या महिलांनाही सुखाचे क्षण अनुभवता यावेत, त्यांचा सन्मान व्हावा यासाठी स्पायका ग्रीन एनर्जी ॲग्रो. रावळगाव साखर कारखान्यातर्फे उपक्रम घेण्यात आला. थेट तोड चालू असलेल्या उसाच्या फडात जाऊन ऊसतोड करणाऱ्या महिलांसमवेत हळदी-कुंकू, तिळगूळ कार्यक्रम केला. त्यामुळे या महीला भारावून गेल्या.
रावळगाव साखर कारखाना कायम ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड व वाहतूकदार कर्मचारी बांधवाबरोबर राहिला आहे. कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने ऊसतोड महिलांना सन्मान देताना हळदी-कुंकू, तिळगूळ देऊन नवीन साडी देण्यात आली. मागील वर्षी कारखानास्थळी महिलांच्या हस्ते साखरपूजन करून हळदी कुंकू कार्यक्रम केला होता.
या वर्षी चार वेगवेगळ्या ठिकाणी फडात जाऊन आनंद पेरण्याचे नियोजन करण्यात आल्याचे कारखान्याचे अध्यक्ष बबनराव गायकवाड यांनी सांगितले. पुढील वर्षी या वर्षी पेक्षा जास्त ऊस गाळप करून बायप्रोडक्ट चालू करू, असे सांगितले.टोळीच्या प्रमुख अक्काताई श्रावण मालचे यांनी कारखाना प्रशासनाचे आभार मानले.
या वेळी ऊस उत्पादक शेतकरी तसेच वंदना बबनराव गायकवाड, सुनीता अरुण गुरगुळे, सुनीता आसाराम भटे, वंदना कुंदन चव्हाण, संचालक अरुण गुरगुळे, संचालक सीताराम फुलसुंदर, उन्मय चव्हाण, शेतकीचे मार्गदर्शक आण्णासाहेब भामरे, शेतकी प्रमुख शिवाजी देसाई, भिकन नेरकर, सोनू गोंधळे, विकी कुंटे शेतकी कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी बहुसंख्येने ऊसतोड कर्मचारी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.