Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसामुळे ९५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Post Monsoon Rain Crop Damage : परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे ५८० गावातील २ लाख ३१ हजार ७८७ शेतकऱ्यांच्या जिरायती, बागायती, फळपिके मिळून पिकांचे ३३ टक्क्यांच्या वर नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे ५८० गावातील २ लाख ३१ हजार ७८७ शेतकऱ्यांच्या जिरायती, बागायती, फळपिके मिळून एकूण ९५ हजार ५३ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांच्या वर नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ८१ कोटी ७५ लाख ४६ हजार रुपये निधी अपेक्षित आहे.

परभणी जिल्ह्यात यंदा ता. २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत वीजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. परभणी, जांब, झरी, सिंगणापूर, पिंगळी, जिंतूर, सावंगी म्हाळसा, बामणी, बोरी, आडगाव बाजार, चारठाणा, वाघी धानोरा, दूधगाव, देऊळगाव, कुपटा, कोल्हा, ताडबोरगाव, कासापुरी, पूर्णा, ताडकळस, लिमला, कात्नेश्‍वर, चुडावा या २३ मंडलांत अतिवृष्टी झाली.

Crop Damage
Chana Crop Damage : संग्रामपूरला शेकडो एकरातील हरभऱ्यावर फिरवला ट्रॅक्टर

या अवेळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे पू्र्ण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून बाधित क्षेत्र अंतिम करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ९ तालुक्यांतील ५८० गावांतील २ लाख ३१ हजार ७८७ शेतकऱ्यांच्या ९५ हजार ५३ हेक्टरवरील पिकांचे ० ते २ हेक्टरच्या मर्यादेत ३३ टक्क्यांच्या वर नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यातील ५५३ गावांतील २ लाख ३० हजार ७८ शेतकऱ्यांच्या ९४ हजार ३३८ हेक्टरवरील जिरायती पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात जिंतूर तालुक्यातील ६९ हेक्टर रब्बी ज्वारी, परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ७ तालुक्यांतील ४८ हजार ५२७ हेक्टरवरील हरभरा, सर्व ९ तालुक्यांतील ३३ हजार २२६ हेक्टरवरील कापूस व १२ हजार ५१५ हेक्टरवरील तूर या पिकांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील ८९ गावांतील ५२१ शेतकऱ्यांच्या ७६.९० हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात जिंतूर, सोनपेठ, गंगाखेड तालुक्यांतील ६१.९० हेक्टर भाजीपाला, सोनपेठ तालुक्यांतील ५ हेक्टर कांदा, पाथरी तालुक्यातील १० हेक्टर टरबूज यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ३६ गावांतील १ हजार १८८ शेतकऱ्यांच्या ६३८.३३ हेक्टरवरील फळपिकाचे नुकसान झाले आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाने

त्यात पूर्णा तालुक्यातील १५.८० हेक्टर केळी व ३८.४४ हेक्टर पेरू, जिंतूर, गंगाखेड, पूर्णा तालुक्यांतील १६.३० हेक्टर पपई, गंगाखेड तालुक्यांतील ४० आर डाळिंब, पाथरी व पूर्णा तालुक्यातील ४९.३२ हेक्टर मोसंबी, जिंतूर व गंगाखेड तालुक्यांतील १ हेक्टर आंबा, पूर्णा तालुक्यांतील ९.६० हेक्टर चिकू, पूर्णा तालुक्यातील ४८०.२० हेक्टर संत्रा यांचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधित गावे, शेतकरी संख्या, क्षेत्र (हेक्टरमध्ये), अपेक्षित निधी (कोटी रुपये)

तालुका बाधित गावे बाधित शेतकरी बाधित क्षेत्र अपेक्षित निधी

परभणी ६५ ३३०३० २१३११ १८.११

जिंतूर १६९ ६०३७५ १९५६६ १६.६४

सेलू ३० १८५१० ५८१० ४.९३

मानवत ५३ ३७७२५ ११६१५ ९.८७

पाथरी ३१ १०००४ ४१३४ ३.५४

सोनपेठ ५४ २८४६१ ७८०६ ६.६४

गंगाखेड ४२ ११२३ ७४२ ०.६५

पालम ४२ १२२६५ ५३०० ४.५०

पूर्णा ९४ ३०२९४ १८७६६ १६.८३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com