Ration Card Verification : शिधापत्रिका तपासणी कामाला वेग

National Food Security Act : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे सरकारच्या योजनांचा लाभ घेत आहेत. अपात्र, दुबार, स्थलांतरित व मृत लाभार्थ्यांना वगळण्यासाठी शिधापत्रिकेची विशेष शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
Ration Card Verification
Ration Card Verification Agrowon
Published on
Updated on

Palghar News : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे सरकारच्या योजनांचा लाभ घेत आहेत. अपात्र, दुबार, स्थलांतरित व मृत लाभार्थ्यांना वगळण्यासाठी शिधापत्रिकेची विशेष शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत शिधापत्रिकाधारकांनी आवश्यक पुरावे व हमीपत्रासह अर्ज ३० एप्रिलपर्यंत सादर करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

विक्रमगड तालुक्यात ३५ हजार १६४ शिधापत्रिकाधारक आहेत. फेब्रुवारी २०१५ पासून राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, त्यानुसार अन्नसुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना अशा दोन गटांत लाभार्थ्यांचे विभाजन करण्यात आले आहे.

Ration Card Verification
Digital Ration Card : आता काढा घरबसल्या ‘डिजिटल शिधापत्रिक्रा’

शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये लाभार्थी संख्या उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अपात्र, दुबार, स्थलांतरित, मृत लाभार्थ्यांना प्राधान्याने वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी पालघर जिल्ह्यात अपात्र शिधापत्रिकांची शोधमोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यात येत आहे. उत्पन्नाच्या निकषानुसार योजनेचा लाभ मिळत असल्याने कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाची नोंद अर्जामध्ये अपेक्षित आहे.

Ration Card Verification
Ration Card e-KYC : शिधापत्रिकाधारकांना १५ पर्यंत ई-केवायसीची अंतिम मुदत

कोणत्या कागदपत्रांची गरज?

शिधापत्रिकाधारकांनी अर्जामध्ये विचारलेली माहिती सोबत जोडलेल्या हमीपत्रासह भरून द्यावयाची आहे. या शिधापत्रिका तपासणी नमुना अर्ज ऑनलाइन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल. शिधापत्रिकाधारकांनी ते राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भाडे पावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, एलपीजी गॅसजोडणी क्रमांकाबाबत पावती, बँक पासबुक, विजचे देयक, टेलिफोन, मोबाइल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र (कार्यालयीन इतर) मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आदी यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com