Lok Sabha Election : राजू शेट्टींची भूमिका ‘एकला चलो रे’ची

Raju Shetti : शेतकरी संघटनांच्‍या दृष्टीने ‍महत्त्वाच्या असणाऱ्या हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Raju Shetti
Raju Shettiagrowon

Kolhapur News : शेतकरी संघटनांच्‍या दृष्टीने ‍महत्त्वाच्या असणाऱ्या हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्यासाठी सोपी वाटणारी निवडणूक आता शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार सत्यजित पाटील यांच्या उमेदवारीमुळे आव्हानात्मक बनली आहे.

मतदार संघात महायुतीचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी. सी. पाटील यांच्यामध्‍ये लढत होणार आहे.

Raju Shetti
Akola Lok Sabha Elections : अकोल्यात रेल्वेच्या कवडीमोल मोबदल्यावर शेतकरी संतप्त; मतदानावर बहिष्काराचा इशारा

श्री. शेट्टी यांनी यापूर्वी सर्व पक्षांशी संधान बांधत खासदारकीसाठी मदत घेतली. पण निवडून आल्यानंतर मात्र कोणत्याच पक्षाशी एकनिष्ठता दाखवली नाही. शेतकरी प्रश्नावरून सर्वच पक्षांशी पंगा घेतला. यामुळे सुरुवातीपासूनच शेट्टींच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याबाबत एकवाक्यता नव्हती.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर श्री. शेट्टी यांनी उद्घव ठाकरे यांनी पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. पण ठाकरे गटाच्या चिन्हावर लढा ही त्यांची मागणी श्री. शेट्टी यांनी नामंजूर केली. यामुळे श्री. ठाकरे यांनी शाहूवाडी तालुक्यातील सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली. यानंतर समीकरण बदलले आहे. या उमेदवारीमुळे शेट्टींना नव्याने आव्हान निर्माण झाले.

Raju Shetti
Lok Sabha Elections : राज्यातील ८ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा

यंदाच्या निवडणुकीत श्री. शेट्टी यांना कोणत्याच पक्षाने सहानुभूती न दाखवल्याने शेट्टींनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. या भूमिकेमुळे यंदाच्या निवडणुकीत या मतदार संघात मोठी चुरस पाहवयास मिळणार आहे. गेल्या पाच वर्षांत शेतकरी प्रश्नांवरून केलेली आंदोलने हेच त्‍यांच्या प्रचाराचे मुख्‍य अस्त्र राहणार आहे.

याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यांच्या बाबतीतील धोरणांवरही ते आसूड ओढू शकतात. यंदाची निवडणूक मात्र श्री. शेट्टी यांची खरी ताकद दाखवणारी असल्याने ही निवडणूक त्यांच्या दृष्टीने व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दृष्‍टीनेही महत्त्वाची ठरणार आहे. श्री. शेट्टी यांच्या भूमिकेला पाठबळ शेतकरी कशा पद्धतीने देतात, यावरच श्री. शेट्टी यांच्या विजयाचे सूत्र ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com