Raju Shetti : ठाकरे गटाच्या हातकणंगलेतील उमेदवारीवर राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले?

Raju Shetti : माजी खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभेसाठी हातकणंगले मतदार संघातून ठाकरे गटाकडे पाठिंबा मागितला होता.
Raju Shetti
Raju Shettiagrowon
Published on
Updated on

Lok sabha Election 2024 : हातकणंगले जागेवर स्वाभिमानी पक्षाचे शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभेसाठी हातकणंगले मतदार संघातून ठाकरे गटाकडे पाठिंबा मागितला होता. मात्र, ठाकरे गटाकडून राजू शेट्टी यांना मशाल चिन्हावर निवडणूक लढण्याची विनंती केली होती. याला राजू शेट्टी यांनी नकार दिल्याने ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, ५ एप्रिल २०२१ ला स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. याचे सर्वात मोठे कारण तीन तुकड्यांमध्ये केलेली एफआरपी आणि भूमि अधिग्रहण कायद्यांमध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांच्यावर फिरवलेला वरवंटा या धोरणात्मक बाबीला विरोध म्हणून आम्ही माविकास आघाडी सोडलेली होती. त्यानंतर स्वाभिामानीच्या राज्य कार्यकारिणीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा जो निर्णय घेतलेला होता त्यावर आम्ही ठाम राहिलो आहे.

गेल्या तीन वर्षापासून लोकसभेची स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी आम्ही केलेली होती. मधल्या काळामध्ये भाजपच्या विरोधातल्या मत विभागणी टाळण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यावा असा विचार काही लोकांनी माझ्यासमोर मांडला होता. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते सातत्याने हातकणंगलेमध्ये आम्ही उमेदवार देणार नाही स्वाभिमानीला सोडणार असे वक्तव्य करत होते. यामुळे हातकणंगले लोकसभेची जागा उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला जाणार होती त्यासाठी मी त्यांना दोन वेळा भेटलो.

याबाबत आमची बरीच सविस्तर चर्चा झाली होती आणि त्यांना काही बाबी पटलेला सुद्धा होत्या लवकरच आम्ही निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं होते. परंतु अचानक त्यांच्याकडून निरोप आला की तुम्ही मशाल चिन्हावर लढले पाहिजे. त्यांच्या चिन्हावर लढणे म्हणजे मी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासारखे आहे.

गेली ३० वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये काम करतोय आम्हाला कोणत्या पक्षासोबत न जाता निवडणूक लढवायला सोपं जाण्यासाठी स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाच्या वतीनेच मी निवडणूक लढवत आलो आहे. पण माझ्या फायद्यासाठी मी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून संघटनेला वाऱ्यावर सोडून ही निवडणूक लढवू शकत नसल्याचे वक्तव्य शेट्टी यांनी केले.

त्यामुळे मी मशाल चिन्ह घेणार नाही असं त्यांना कळवल्यानंतर त्यांनी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केलेला आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा, सामान्यांचा, गोरगरिबांचा आवाज संसदेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी स्वतंत्र्या निवडणुक लढवत असल्याचे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com