Vegetable Farming : प्रतिकूलता, आपत्तीतून सावरत मुळा पिकात अव्वल नाव

Radish Production : धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील राजेंद्र व जितेंद्र या बडगुजर बंधूंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती व कोसळलेल्या भयंकर आपत्तीवर मात करीत शेतीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
Vegetable Farming
Vegetable FarmingAgrowon
Published on
Updated on

मुकुंद पिंगळे
Vegetable Production : धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील राजेंद्र व जितेंद्र या बडगुजर बंधूंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती व कोसळलेल्या भयंकर आपत्तीवर मात करीत शेतीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. वडिलांच्या अकाली निधनानंतर आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना वाढवले. पीकपद्धतीत बदल, वाण निवड, सुधारित व्यवस्थापनातून मुळा पीक व पालेभाज्या शेतीत या बंधूंनी अव्वल नाव मिळवले आहे.
.

धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील राजेंद्र व जितेंद्र या बडगुजर बंधूंनी सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामांतून पालेभाज्या व मुळा या पिकांमध्ये ‘मास्टरी’ आणि त्याचबरोबर ओळख मिळवली आहे. त्यांची शेती सरवड (ता.जि. धुळे) शिवारात आहे. सन १९९१ मध्ये वडील रमेश यांचे अकाली निधन झाले.

आर्थिक परिस्थिती हलाखीची, डोक्यावर कर्जाचा बोजा अशा स्थितीत आई निर्मलाबाई यांनी दोन्ही मुले व दोन मुलींचे पालनपोषण केले. आर्थिक परिस्थितीमुळे राजेंद्र यांना बारावीपर्यंत तर जितेंद्र यांना दहावीपर्यंत शिक्षण घेता आले. सन १९९७ पासून ते शेती करू लागले. बाजरी, ज्वारी, उडीद अशी पारंपरिक पिके असायची. परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा आदर्श व आर्थिक जुळवाजुळव करत त्यांनी सिंचन सुविधांचा विकास केला. एकूण साडेतीन एकर स्वमालकीची तर बटाई पद्धतीने ४.५ एकर शेती आहे.

Vegetable Farming
Vegetable Crop : वेलवर्गीय भाजीपाला पिकात मंडप कसा उभारावा?

भाजीपाला आधारित शेती पद्धती

सन २००७ पासून भाजीपाला केंद्रित शेती बडगुजर बंधू करतात. यात टोमॅटो, भेंडी या व्यतिरिक्त
पालक, मेथी, कोथिंबीर आदी पालेभाज्या व मुळा हे मुख्य पीक असते. खरीप व लेट खरिपात
लाल व पांढरा कांदा असतो.

त्यात मुळा हे पीक वर्षभर घेत असून, एकूण लागवडीच्या तुलनेत पिकाचा वाटा ७० टक्के असतो. चौदा वर्षांपूर्वी परिसरात मुळा लागवडी होत्या. बाजारातील मागणी पाहून बडगुजर यांनीही तेव्हापासून या पिकात सातत्य ठेवले आहे.

Vegetable Farming
Vegetable Farming : कुंजीरवाडीने मिळवली पालक पिकात ओळख

मुळा पीक व्यवस्थापन

-वर्षभर मालाचा पुरवठा कायम राहील या दृष्टीने वर्षात पाच टप्प्यात पाण्याच्या उपलब्धतेनुसार कमी अधिक प्रमाणात लागवडीचे नियोजन. त्यादृष्टीने दरवर्षी जून, ऑगस्ट, ऑक्टोबर व डिसेंबर अशा चार टप्प्यांत मुळ्याची लागवड. उन्हाळ्यात हे पीक घेतले जात नाही. -दर हंगामात त्याचे क्षेत्र २५, ३० गुंठे ते एक एकर.


-बाजारपेठेतील १४ वर्षांच्या कालावधीतील मागणी, दरांचे चढ उतार पाहिले. त्यानुसार लांब आकार, सफेद रंग व हिरवा गर्द पाला अशा जुडीला बाजारात अधिक मागणी असल्याचे जाणवले. तसे अधिक उत्पादनक्षम वाण घेण्यास सुरुवात.
-लावणीनंतर सुपर फॉस्फेटचा एकरी ४० किलोच्या तीन गोणी याप्रमाणे वापर. सुरुवातीला
प्रवाही पद्धतीने सिंचन. लावणपश्‍चात चार दिवसांच्या फरकाने तीन वेळा सिंचन

काढणी नियोजन

मुळा सुमारे ४० दिवसांचे पीक आहे. त्याचे काढणी व्यवस्थापन चोख करावे लागते. मजुरांच्या उपलब्धतेनुसार तीन टप्प्यांत १५ दिवस हे काम चालते. पहिल्या काढणीच्या वेळी आकार पाहून मुळे उपटताना ते तुटणार नाहीत याची काळजी घेत पाल्यासह ते गोळा केले जातात.

शेतालगत तयार केलेल्या पाण्याच्या कुंडीत स्वच्छ धुऊन सुकवले जातात. डाग, वाकडेपणा, आकार पाहून प्रतवारी होते. त्यानंतर २५ नगांची एक अशा जुड्या बांधल्या जातात.
स्वच्छता व मालाचा एकसारखेपणा बाजारपेठेसाठी महत्त्वाचा असल्याचे जितेंद्र सांगतात.

एकरी उत्पादन- २५ क्विंटलपासून ते ३०, ३५ ते कमाल ४० क्विंटलपर्यंत.

सुरत मार्केटला अधिक वाव शहादा, नंदुरबार, धुळे या मुळ्यासाठी बाजारपेठा आहेत. मात्र गुजरातेतील सुरतच्या बाजारपेठेत त्यास सर्वांत जास्त मागणी असते. जिथे भाव, तिथे विक्री असे गणित ठेवल्याचे जितेंद्र सांगतात. जून, जुलै काळात धुळ्याला दर २५ ते ३० रुपये प्रति किलो असतात. पुढे लागवडी व आवकही वाढत जाऊन दर कमी होतात. डिसेंबरनंतर दर कमी मिळतात. पूर्वी सुरत बाजारासाठी ५० पैसे प्रति किलो वाहतूक खर्च होता. आता तो २.५० रुपये आहे. त्यामुळे खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न असतो. मिळालेले दर रुपये. (प्रति किलो) वर्ष.. .किमान...कमाल...सरासरी २०२०. १० २० १५ २०२१ १३ ३० १६ २०२२ ९ २५ १५

आपत्तीतून सावरत उंचावले अर्थकारण

सन २०१२ मध्ये भाजीपाला विक्रीसाठी जात असताना जितेंद्र यांना एका वाहनाने जोरदार धडक दिली. महिनाभर ते कोमात होते. पाच लाख रुपये खर्च आला. एक एकर जमीन विकावी लागली. पण नव्या दमाने पुन्हा सुरवात करीत जितेंद्र या भयंकर आपत्तीतून सावरले. पत्नी कविता, बंधू राजेंद्र, भावजय ममता यांच्या साह्याने शेतीत परिश्रम घेत मुळ्याला मेथी, कोथिंबीर, पालक आदींची जोड दिली. पीकपद्धती बदल, व्यवस्थापनात सुधारणा व व्यावसायिक हुशारी या बाबी आत्मसात केल्या. हंगामी सुमारे मजुरांना रोजगार दिला. आज वार्षिक लाखांचे भांडवल तयार केले आहे. शेतीचे अर्थकारण उल्लेखनीय रित्या उंचावले असून शेती, घरखर्च, मुलांचे शिक्षण असे आर्थिक नियोजन शक्य झाले आहे. डोक्यावर कर्ज नाही. आई निर्मलाबाईंचे मार्गदर्शन होते. आईने केलेल्या संघर्षाची प्रेरणा घेतच मुलांनी प्रयोगशीलता आणली. विहीर, पाइपलाइन सुविधा तयार केली.

शेतीत अडचणी खूप आहेत. खुल्या आभाळाखाली टिकून राहणे सोपे नाही. पण कष्ट, चिकाटी व कोणत्याही प्रसंगात खचून न जाता हिंमत ठेवली पाहिजे. शेतीतील उत्पन्नातून काटकसर करीत प्रपंच नेटका चालवता येतो. नफ्यानंतर तोटा व तोट्यानंतर नफा हेच शेतीचे चक्र आहे.

जितेंद्र बडगुजर ९४२०३९६२९७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com