Team Agrowon
सामान्यतः वेलीसाठी मंडप किंवा तारेच्या ताटीचा आधार देता येतो. मंडप उभारणी करताना लोखंडी खांबाचा किंवा बांबूचा वापर केला जातो.
खांब किंवा बांबू कुजू नयेत, यासाठी जमिनीत गाडल्या जाणाऱ्या भागावर गाडण्यापूर्वी डांबर लावावे.
मंडपाच्या सर्व तारांना सारखा ताण देणे आवश्यक आहे. तारा केवळ हाताने किंवा पकडीच्या साह्याने ओढून पाहिजे तेवढा ताण देता येत नाही. त्यासाठी लोखंडी पुलर व लाकडी पुलरचा वापर करणे फायदेशीर ठरते.
मंडप पद्धतीमध्ये दोन ओळींतील अंतर १० ते १२ फूट आणि दोन वेलींतील अंतर ३ फूट ठेवावे.
एक टोक वेलाचा खोडाजवळ काठीच्या आधाराने बांधावे, तर दुसरे टोक तारेस बांधावे. वेलीची वाढ ५ फूट होईपर्यंत वेलीची बगलफूट काढत राहावी.
मुख्य वेल मंडपावर पोहोचल्यानंतर त्याचा शेंडा खुडावा. राखलेल्या बगलफुटींच्या वाढ होण्यासाठी भर द्यावा.
भाजीपाला पिकामध्ये लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणे व आधार देणे आवश्यक असते. त्यातून दर्जेदार आणि अधिक उत्पादन मिळवणे शक्य होते.