Raisin
RaisinAgrowon

Raisin Production : बेदाणा निर्मितीसाठी शेडची डागडुजी, स्वच्छता सुरू

Agricultural Shed Renovation : यंदाच्या बेदाणा हंगाम निर्मितीसाठी जिल्ह्यातील नागज आणि सोलापूर जिल्ह्यातील जुनोनी परिसरातील बेदाणा शेड मालकांनी हंगामाची पूर्वतयारी सुरू केली आहे.
Published on

Sangli News : यंदाच्या बेदाणा हंगाम निर्मितीसाठी जिल्ह्यातील नागज आणि सोलापूर जिल्ह्यातील जुनोनी परिसरातील बेदाणा शेड मालकांनी हंगामाची पूर्वतयारी सुरू केली आहे. सद्यःस्थितीला २५० हून अधिक शेडची डागडुजी आणि स्वच्छतेची कामे शेडमालकांनी हाती घेतली आहेत. पंधरा दिवसांपासून बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू होईल, असे बेदाणा शेड मालक आणि उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यातील नागज परिसरासह अन्य भाग आणि सोलापूर जिल्ह्यातील जुनोनी भागात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू होतो. हंगामाची पूर्वतयारी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होते. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून द्राक्ष हंगामातील फळ छाटणीदरम्यान, पडणारा अतिपाऊस आणि परतीच्या पावसामुळे द्राक्षाचे नुकसान होते. परिणामी, बेदाणा हंगाम लांबणीवर पडत आहे. त्यामुळे जानेवारीच्या मध्यापासून हंगामाची पूर्वतयारी केली जाते.

Raisin
Agriculture Equipment Bank: गावामध्ये असावी कृषी अवजारे बँक

यंदाच्या हंगामातही फळ छाटणीला काही अंशी या पावसाचामुळे अडथळे निर्माण झाले. त्यातूनही शेतकऱ्यांनी फळ छाटणी केली. परंतु परतीचा पाऊस हा फळ छाटणी केलेल्या द्राक्ष पिकाला मारक ठरला. त्यामुळे जानेवारीच्या मध्यापासून बेदाणा निर्मितीचा सुरू होणारा हंगाम पंधरा ते वीस दिवस पुढे गेला.

नागज परिसरासह अन्य भाग आणि सोलापूरमधील जुनोनी भागात सुमारे ७ हजार बेदाणा शेड आहेत. सध्या २५० हून अधिक शेडची डागडुगी, स्वच्छता करण्याचे काम शेड मालकांनी हाती घेतले आहे. या कामासाठी स्थानिक आणि परराज्यातील अंदाजे ५०० मजूर दाखल झाले आहेत. उर्विरत शेडची दुरुस्ती आणि स्वच्छता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

Raisin
Agriculture Technology: शक्तिचलित मळणी यंत्राचे प्रकार, अंतर्गत घटक

गेल्या तीन ते चार वर्षांत कमी पाऊस, अतिवृष्टी यासह नैसर्गिक आपत्तीचा फटका बेदाणा निर्मितीला बसला. त्यामुळे या भागातील अंदाजे एक हजार शेडवर बेदाणा निर्मिती करण्याचे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा पाच ते सहा हजार शेडवर बेदाणा निर्मिती होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरवर्षी बेदाणा शेडवर काम करण्यासाठी मध्यप्रदेश, बिहार यासह अन्य राज्यातील सुमारे २० हजारहून अधिक मजूर दाखल होता.

द्राक्ष विकून शिल्लक राहिलेल्या मालापासून बेदाणा बनवण्यासाठी शेतकरी विचारू लागला आहे. त्यामुळे दोन शेडवर बेदाणानिर्मिती सुरू केली आहे.
सुनील माळी, बेदाणा शेडमालक, केरेवाडी, ता. कवठेमहांकाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com