Sangli News : दरवर्षी बेदाणा निर्मितीचा हंगाम फेब्रुवारी महिन्यात सुरू होतो. मात्र यंदा अवकाळी पावसाचा फटका विक्रीला आलेल्या द्राक्षाला बसला. त्यामुळे शेतकरी लवकर बेदाणा निर्मितीकडे वळाले. त्यामुळे यंदाचा बेदाणा हंगाम एक महिना अगोदर म्हणजे जानेवारी महिन्यापासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील नागज आणि सोलापूर जिल्ह्यातील जुनोनी परिसरात यंदाचा बेदाणा हंगामाला गती आली असून सुमारे चार हजार शेडवर बेदाणा निर्मितीची धांदल सुरू झाली आहे.
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय मार्गावर नागज ते जुनोनी या ३५ किलोमीटरच्या पट्ट्यात छोटी-मोठी पाच हजारांहून अधिक शेड आहेत. दरवर्षी बेदाणा निर्मितीचा हंगाम सर्वसाधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होते. त्यामुळे नवा बेदाणा फेब्रुवारीच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यांत विक्रीस येतो.
फेब्रुवारी ते मे या अवघ्या चार महिन्यांत येथे बेदाणा निर्मितीची लगबग सुरू असते. सर्वसाधारण बेदाणा तयार होण्यासाठी ३५ अंश तापमानाची आवश्यक असते. ३५ अंश तापमान असल्याने बेदाणा तयार होण्यास सुमारे १० ते १२ दिवसांचा कालावधी लागतो.
मात्र यंदा द्राक्ष काढणीच्या अगोदर म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत अवकाळी पावसाने द्राक्षाचे नुकसान झाल्याने त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी बेदाणा तयार करण्यासाठी नियोजन करू लागला. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील नागज परिसरातील बेदाणा शेड मालकांनी डिसेंबर महिन्यातच शेडच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले.
त्यानंतर बेदाणा निर्मिती सुरू झाली. दरम्यान, नागज परिसरातील शेडवर बेदाणा निर्मितीचा हंगाम जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली आहे. परंतु निर्मितीला फारशी गती आली नव्हती. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील जुनोनी परिसरात बेदाणा शेडची दुरुस्ती पूर्ण करून बेदाणा निर्मितीसाठी शेड सज्ज केले आहेत.
सध्या दोन्ही भागातील सुमारे चार हजार शेडवर बेदाणा निर्मिती सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाणा शेडवर बेदाणा तयार करण्यासाठी शेतकरी नियोजन करत आहेत. सांगली, सोलापूर आणि विजापूर या जिल्ह्यांतून शेतकरी द्राक्ष बेदाणा निर्मितीसाठी घेऊन येतात. सध्या बेदाणा निर्मितीला पोषक वातावरण असून, बेदाणा तयार होण्यासाठी १३ ते १४ दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे दर्जेदार बेदाणा तयार होवू लागला आहे.
एक महिना हंगाम लवकर
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू होतो. मात्र अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील नागज परिसरातील बेदाणा शेड मालकांनी डिसेंबर महिन्यातच बेदाणा शेडची दुरुस्ती केली. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू झाला. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नव्या बेदाणा मार्केटमध्ये विक्रीस आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.