Mumbai Rain: मुंबईतील पावसाने २६ जुलै २००५ ची आठवण; अनेक भागात जनजिवन विस्कळीत

Heavy Rainfall: मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, २६ जुलै २००५ च्या पावसाची आठवण जागी झाली आहे. वाहतूक ठप्प, सखल भागात पाणी साचले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Maharashtra Rain
Maharashtra RainAgrowon
Published on
Updated on

Pune News: मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबईतील पावसाने २० वर्षांपुर्वीची आठवण करून दिली आहे. २० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै २००५ मध्ये मुंबईत तब्बल ९४४ मिलिमीटर पाऊस पडला होता. रस्ते, घरे, दुकाने जलमय झाली होती. यात जवळपास १ हजार नागरिकांचा मृत्यूही झाला होता. 

मुंबई आणि उपनगरात मागील ४ ते ५ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे काही भागात जनजीवन विस्कळीत झाले होते. याचा थेट परिणाम लोकल आणि रस्ते वाहतूकीवर प्रमाणातर झाला आहे. उपनगरांमध्ये काही भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील काही उपनगरीय गाड्या उशिराने धावत आहेत. तर, मध्य रेल्वेवरील गाड्या देखील १० ते १२ मिनिटे, तर हार्बर मार्गावरील गाड्या ७ ते ८ मिनिटे उशिराने सुरू आहेत. रस्त्यांवर वाहतूक कोंडी जाणवत असून, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Maharashtra Rain
Jalna Rain : जालना जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक

भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यांतील काही भागांमध्ये पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच, ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा इशाराही दिला आहे. त्यातच, आज संध्याकाळी ७:२७ वाजता समुद्रात १.२६ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. २६ ते २७ जुलैदरम्यान लाटांची उंची ४.११ मीटरपर्यंत जाऊ शकते. रविवारी सकाळी लाटा ०.६५ मीटरपर्यंत असतील. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. तसेच, मदतीसाठी १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Rain
Pune Heavy Rain: ताम्हिणी घाटमाथ्यावर २१० मिलिमीटरची नोंद

मुंबईतील या पावसाने २६ जुलै २००५ च्या पावसाची आठवण करून दिली आहे. त्या दिवशी २४ तासांत मुंबईत ९४४ मिमी पावसाची नोंद झाली होती. परिणामी संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती, अनेक घरे, दुकाने आणि रस्ते पाण्याखाली गेले होते. हजारो नागरिक कार्यालये, शाळा, रेल्वेगाड्यांमध्ये अडकून पडले होते. जवळपास १४ हजार घरांचे नुकसान झाले आणि सुमारे १ हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आज २० वर्षे झाली असली, तरीही ही घटना आजही मुंबईकरांच्या मनात ताजी आहे.

दरम्यान, मुंबई वाहतूक पोलिसांनी नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. "आपत्कालीन परिस्थितीत कृपया १००, ११२ किंवा १०३ या क्रमांकांवर संपर्क साधा," असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवल्या असून, सर्व अधिकारी सतर्क असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com