Monsoon Rain : सिंधुदुर्गात उन्हात पावसाच्या सरी

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) कडक उन्हात पावसाच्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाच्या सरी झाल्या.
Rain Update
Rain UpdateAgrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) कडक उन्हात पावसाच्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाच्या सरी झाल्या. दरम्यान, मॉन्सून सिंधुदुर्गच्या वेशीवर, गोव्यात दाखल झाल्याचे हवामान विभागाने मंगळवारी (ता. ४) जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही क्षणी मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

Rain Update
Monsoon Rain : माॅन्सूनची राज्यात जोरदार मुसंडी; राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये माॅन्सून दाखल; पावसाला पोषक हवामान

जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती होती. परंतु त्यानंतर कडक ऊन पडले. सकाळी साडेअकराच्या सुमारास जिल्ह्यात कडक उन्हात पावसाच्या सरी पडण्यास सुरुवात झाली. जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाच्या सरी सुरू होत्या. साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटे सर्वत्र पाऊस झाला. पाऊस थांबला असला तरी सर्वत्र पावसाचे वातावरण कायम होते.

Rain Update
Pune Rain : पुण्यातील वडगावशेरी येथे सर्वाधिक १२० मिलिमीटर पाऊस

कडेगाव तालुक्यात पावसाची हजेरी

सांगली जिह्यातील कडेगाव तालुक्यात मंगळवारी (ता. ४) तासभर वादळी वारे, गारा व विजांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. शेतामध्ये चांगली ओल निर्माण झाली, तर अनेक ठिकाणी सखल ठिकाणी व शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

तालुक्यातील अनेक ओढे-नाले वाहू लागले आहेत. सध्या तालुक्यात खरीप पिकांची पेरणीपूर्व मशागतींची कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे हा पाऊस मशागतीच्या कामांना चांगलाच लाभदायक ठरला आहे. या पावसामुळे खरीप हंगामाला व आडसाली ऊस लावणीला चांगला लाभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. तसेच पलूस तालुक्यातील दुधोंडी परिसरातही पावसाने हजेरी लावली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com