Pune Rain : पुण्यातील वडगावशेरी येथे सर्वाधिक १२० मिलिमीटर पाऊस

Rain Update : इंदापूर, खेड, आंबेगाव तालुक्यांतही काही ठिकाणी पाऊस
Pune Rain
Pune RainAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे : मॉन्सून राज्याच्या सीमेवर दाखल होताना राज्यातील वातावरणात मोठे बदल होत आहेत. पुणे जिल्ह्यात वातावरण अचानक ढगाळ होत असून जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत पुणे शहरातील वडगावशेरी येथे सर्वाधिक १२०.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. याशिवाय इंदापूर, खेड, आंबेगाव तालुक्यांतही काही ठिकाणी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील वातावरणात उकाडा वाढला आहे. काही वेळा ढगाळ वातावरण तयार होत आहे. मंगळवारी (ता. ४) दुपारी अचानक वादळी पाऊस झाला. यामध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार वडगावशेरी परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
वडगावशेरी येथे मुसळधार पावसामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे धानोरी, विश्रांतवाडी, लोहेगाव, सिंहगड रोडसह काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली. शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित होत असल्याचेही समोर आले आहे. तर अनेक ठिकाणी झाडे पडझडीच्या घटना घडल्या होत्या.

Pune Rain
Pune Rain : पुणे जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाची बारा दिवसांत १२७ मिलिमीटर पावसाची नोंद

ग्रामीण भागामध्ये इंदापूरमध्ये दुपारी चारच्या दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. तब्बल दोन तास चाललेल्या पावसामुळे उष्णतेच्या लहरी कमी झाल्या आहेत. खेडमध्ये तिन्हेवाडी येथे शेतात भुईमूग काढायला गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. मंगल रंगनाथ आरडे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारपासून पावसाने वातावरण दिसत असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती. शेतात काढलेल्या बाजरी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.

पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये :
ठिकाण --- पडलेला पाऊस
वडगाव शेरी --- १२०.५
शिवाजीनगर -- ६८.३
कोरेगाव पार्क --- ८०.०
मगरपट्टा -- २८.०
पाषाण --- २३.७
चिंचवड --- २३.५
तळेगाव -- १४.५
एनडीए -- ५.०
लोणावळा -- ५.०
हडपसर -- ४.०
राजगुरुनगर -- ३.५
लव्हळे --- २.५
दौंड --- १.५
गिरीवन -- १.०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com